फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ३१ जुलै, २०१०

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी...

एकांतात जवळ येऊन,हळूच रडायला सांगतात
रडताना तुला आठवायला,पुन्हा पुन्हा भाग पडतात

त्या असतात तुझ्या आठवणी ....



डोळ्यांची कवाडे बंद ठेवली तरीही
मनातून डोळ्यात प्रवेशतात
आणि पुन्हा गालावर घरंगळून
आपली उपस्थिती दाखवतात

त्या असतात तुझ्या आठवणी...



रात्रीच्या जीवघेण्या गडद एकांतात
मला अंधुकश्या आनंदाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात
आणि वास्तवाशी फारकत घेतलेल्या
मस्तवाल आठवणींसोबत जरा वेळ घालवल्यावर
पुन्हा एकदा मनातल्या कोपऱ्यात जाऊन बसतात

त्या असतात तुझ्या आठवणी...




तुला विसरण्याच्या प्रयत्नात असताना..
क्षणाचीही उसंत न देता,
तुझ्याकडे शिळ घालून बोलवणाऱ्या
आणि पुन्हा एकटाच चालायला लावणाऱ्या

त्या असतात तुझ्या आठवणी...

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी....

सगळे विचारतात...

सगळे विचारतात...


"अशा कशा रे तिच्या आठवणी सगळ्या दुखः द ?
एखादी ही नाही का हसरी....?"


"ती हसायची,
तेव्हा माझ्या सोबत असायची,
आणि ती असायची तेव्हा
तिची आठवण नसायची....

आता ती नाही तर आठवण आहे,
..
..
..

अजून आठवतंय....

ती जाताना वाचले होते मी तिचे डोळे, 
ती पुसत होती जरी,
ती दिन रात रडत असताना, 
तिची आठवण तरी कशी येईल हसरी ?"

सांगा ना....

मी तुझी "सावली" आहे म्हणून ..

काल दुपारी एक वेडा पाहिला
कधी हसायचा कधी रडायचा
कधी चालायचा कधी थांबायचा
.
डावीकडे , उजवीकडे कधी 
कधी सरळ मागे कधी
चाले कधी धावे कधी 
कळे न काय शोधी नक्की 

मधेच फतकल मारून बसायचा 
हाताच्या मुठी आवळून जमीन बडवायचा



कदाचित तो स्वताच्या सावलीपासून 
पीछा सोडवू पाहत होता ..
.
मग मी तुझ्या आठवणींपासून 
दूर धावणे थांबवले..
कारण
एकदा तू म्हणालीस होती
मी तुझी "सावली" आहे म्हणून ......

आज जरा जास्तच भरून आलंय,

आज जरा जास्तच भरून आलंय,
आभाळासारखे मन
आज पुन्हा नव्याने टोचतंय जुनंच,
पण अस्तित्वात नसलेलं ऊन 

नेमका कुठे चाललोय मी
घेऊन, ओढत फरपटत स्वतःलाच

कदाचित शेवटचाच प्रवास असावा हा,
कारण रस्ता तर नाहीयेच,
नुसत्या स्मरणद-या दिसताहेत ....
खोलवर... खोलवर... खोलवर...
.
.
.

झोकून देईन स्वतःला दरीभर
तेव्हा मिटतील सा-याच स्मरणव्याधी
मग बनेल तुझ्या आठवणींच्या खाईत
माझ्या उध्वस्त प्रेमाची समाधी

रांगाच्या रांगा लाऊन

रांगाच्या रांगा लाऊन
उभ्या आहेत तुझ्या आठवणी

तिकीटबारीवर असतात ना तश्या....
एका पाठी एक.

नक्कीच त्या मला पुरतील आयुष्यभर...
पण तोवर मी उरेल की नाही, कुणास ठाऊक ?

उरलो तरी आज इतकाच,
झुरेल की नाही कुणास ठाऊक ?
..
.

कारण......
तेव्हा माझ्या वयाची दीर्घता जास्त असेल
की तुझ्या आठवणींची तीव्रता.....

कुणास ठाऊक ?

तू दूर दूर जाता...


तू दूर दूर जाता मी एकटाच राहीलो,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहीलो...
तू अशी निघून जाता मी मलाच हरवून बसलो,


ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले,
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...

आठवते का ग तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी, अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...

मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता माझ्या मनी...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का ग?
एकच सांग मला की तू परत येशील का ग?

शुक्रवार, ३० जुलै, २०१०

भर पावसात जेव्हा तीही तुझ्यासाठी रडेल..


उल्हासित होते मन सर्वांचे
वर्ष ऋतूच्या आगमनाने
चातकाची ही तहान भागते
येणाऱ्या पावसाच्या त्या सरीने

झाडानाही नवीन पालवी येते
नवीन आयुष्याची संधी देते
मातीही ती सुगंधित होते
वर्षा ऋतूचे जेव्हा आगमन होते

असतो एक चालत पावसात त्या
एकांतात अन आपुल्या विचारात
नाही भान जगाचे त्याला नाही स्वतचे
कोणास ठाऊक आहे जगत तो कोणत्या जगात..

चुकांचे तिच्या खापर त्याने
स्वताच्या माथी आनंदाने फोडले
सुखाला तिच्या दारी पोहचवता
डोळ्यांनी रक्ताचे अश्रू ते ढाळले,,

भर पावसात चालतो तो एकटा
लपवूनी चेहरा जगापासून स्वताचा
दुख ते पाहण्यास वेळ कोणाकडे असते
पावसाच्या सरींत अश्रूंनाही किंमत नसते..

रडशील किती अजुनी तू रे वेड्या
आहे सुखी ती.. तोड तू स्वताच्या बेड्या
तुझ्या प्रेमाची किंमत एकदा तिला कळेल
भर पावसात जेव्हा तीही तुझ्यासाठी रडेल....तुझ्यासाठीच रडेल...

आज माझ्या सोबत नाहीस


आज माझ्या सोबत नाहीस
मला खुप दुःख होतय
तुझ्या दूर जाण्यान मला
खुप भरून येतय
प्रतेक वेळी तू माझ्या
सोबत असायचीस
कधीच मला सोडून
दूर नाही रहायचीस
तू सोबत असल्यावर
मला खुप लोक.. पहायची
तुज्या सौंदर्याची स्तुती
आई, नेहमी सर्वांसमोर करायची
मला तिचा खुप अभिमान
वाटायचा
तिचा सहवास मला खुप
हवा हवा सा वाटायचा
आज .....
अचानकच ती गायब झाली होती
माझी भर पावसात खुप दैना झाली होती
सगल डोक आणि अंग भिजतय
माझी आई खुप रागवतेय
कृपया माझी छत्री आणून दया ना
नाहीतर तुम्हाला पाप लागेल

गुरुवार, २९ जुलै, २०१०

बघ काय दुर्दशा झालीये

बघ काय दुर्दशा झालीये, तुझ्या आठवणींशिवाय
मला जणू व्यसनच लागले आहे त्यांचे..दिनरात

पण आता आता त्या दिसेनास्या झाल्यात,
डोळ्यांच्या पटलावरती त्यांची काही पुसट चित्रे दाटलेली आहेत,
त्याही स्पष्टपणे ओळखू येत नाहीत..

मला तू नकोयेस, 
फक्त तुझ्या काही आठवणी पाठवुन दे...

बदल्यात देवाकडे मागणे घालतो, 
तुला हवे ते मिळु देत.. माझ्याशिवाय.....

शंभर आठवणी काढल्यात,

शंभर आठवणी काढल्यात,
एकदा तरी येऊन जा....

जास्त काही मागत नाही
एखादी भळभळणारी ताजी जखम देऊन जा....

टवके उडालेत आजवर जपलेल्या आठवणींचे
फारच हाल अपेष्टा सोसताहेत त्या
कमीत कमी त्या आठवणींचे खड्डे तरी बुजवुन जा,
..
..

त्यात लावेल मी एक रोप मग...
घालेन रोज खत पाणी पण,

काही वर्षांनी तू सुद्धा येशील बघायला,
वयात आलेली तुझी आठवण

देतात जगण्याचे बळ, आठवणी तुझ्या

देतात जगण्याचे बळ, आठवणी तुझ्या

जेव्हा कधी वाटते दाटतायेत अश्रू डोळ्यात,
त्यांची पारायणे करीत बसतो....

थकून, खंगून गेलोय मी, अनेकदा वाटते जगू नये
एखाद्या उंचावरून स्वतःचा कडेलोट केला असता एकवेळ
जर नसत्या तुझ्या आठवणी सोबत...

खरेच माफ कर मला,
मी समजायचो इतक्या वाईट नाहीयेत या आठवणी,
..
..

तुझ्या इतक्या तर नक्कीच नाहीत....
बघ नं, एकट्या राहूच देत नाहीत मला

आठवत मला ...( काल रात्री केलेली माझ्या जानू साठी )

आठवत मला ते गार्डन
आपन तिथे भेटायचो...
तु यायच्या आधी मी तिथे
उभ असायचो...
तुझी वाट पहात सारख
घडयाल बघत बसायचो
आठवत मला....

आठवत तुझ ते हळुवार येण
जवल माझ्या येउन माझ्या बाजूला बसणं
हात हातात घेउन ते नजरेमधे पहाण
मनात काही बोलुन ते गालामधे हसण
आठवत मला...

आठवत आपल ते चोरुन भेटण
अचाणकपणे कुणीतरी आपल्याला बघन
माझ्यापासुन दुर तुला ओढत घेउन जाण
माघारी वळुन तुझ ते केविळ्वाण पहाण
आठवत मला....

आठवत तुझ शेवटच भेटणं,

मी जबरदस्ती तुझी इच्छा नसताना तुझ्याशी बोलन,
तू लाख बोललीस मला तुझ्यात इंटरेस्ट नाही माझ तुझ्यावर प्रेम नाही,
पण ह्या वेड्या मनच सारखं तुझ्याचसाठी झुरणं...
आठवत मला...

बुधवार, २८ जुलै, २०१०

मी रात्री झोपण्यापूर्वी..

मी रात्री झोपण्यापूर्वी..
सर्व दारे, खिडक्या लाऊन घेतो..
पण एक छोटासा झरोका मात्र उघडा ठेवतो..
तुझ्या आठवणींना येण्यासाठी...

त्या येतातही, अन मनात साठून राहतातही
मनाच्या खोलीत ठेवलेल्या या सा-या,
तुझ्या आठवणी मी नेहमी तपासून पाहतो..
कारण त्यांनासुद्धा आहे,
अशीच वेळी अवेळी बाहेर पडायची सवय..

त्या व्यवस्थित हृदयामध्ये निजल्याची खातरजमा
केल्याशिवाय मी माझ्या खोलीच्या बाहेर पडत नाही..

समुद्राच्या लाटांनी मन मोहरून गेले

समुद्राच्या लाटांनी मन मोहरून गेले 
तुझ्या आठवांनी पुन्हा ते बहरून गेले 
वारा मंद वाहत आहे, 
जणू स्पर्श तुझा होत आहे
लाटांच्या आवाजाचा आव घेऊन 
जणू पैंजण तुझे गात आहे
त्याच ठिकाणी बसलो आहे 
जिथे तू आणि मी भेटायचो 
तुझ्या डोलत बुडणाऱ्या माझ्या 
मनाला किती मुश्कीलिनी आवरायचो
खंत एकच आहे आज 
एकटाच सूर्यास्त पाहत आहे 
आणि अलगद एक लाट 
पायाला स्पर्श करून गेली
बघ पुन्हा..................
गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली आहे........... 

तुझ्या आठवणीत मनपाखरू,

तुझ्या आठवणीत मनपाखरू, 
जेव्हा फिरते भिरभिर
ओल साचते डोळ्यात, 
नी काळजात दुखते खोलवर

विव्हळणा-या वेदना, 
सुखावून जातात आठवणीने,
आणि विसावल्या जखमाही, 
जाग्या होतात क्षणभर

येणा-या आठवणींसाठी मी, 
जागा करतो घरात माझ्या
जगून घेतो संगे, 
जसा कधी जगलोच नव्हतो आजवर

तुला जायचे असेल तर, नक्की जा...

तुला जायचे असेल तर, नक्की जा...
एकदा फुटक्या हृदयाचे गाणे तरी ऐकून जा...

आणि तू काही आठवणी देणं लागतेस...
तेवढ्या मात्र माघारी देऊन जा..

खेळ संपला की, 
डाव परत मांडण्याच्या आशाही संपतात..

तू तर माझ्या आयुष्याशी खेळलीस,
किमान मला त्या आठवणींसोबत खेळू देत...

तुझ्या कडून तर कधी, भेटलेच नाही मला काही 
हवे तर माझा अंकुरलेला जीव पुन्हा एकवार घेऊन जा 

पण तू काही आठवणी देणं लागतेस...
तेवढ्या मात्र माघारी देऊन जा..

मी रोज वेळेवर उठतो,

मी रोज वेळेवर उठतो,
ठरलेली लोकल पकडतो,
वेळेआधी ऑफीस गाठतो,
थोपलेली कामे करतो,
निमुटपणे मिळेल ते खातो,
ओवरटाईम करून घरी येतो..
नंतर रात्रभर जागा राहतो....

तुला विसरण्यासाठी कुठलीच रात्र पुरत नाही...

आणि सकाळी उठल्यावर,
जगण्याच्या गर्दीत हरवलेला आठवणींचा धूसर चेहरा..
मला आरश्यातून डोकावून पाहतो...

कुठे वाहतो आता मी

कुठे वाहतो आता मी, 
पहिल्यासारखा गर्दितून ?
हां जरासा डोकावतो, 
फक्त कधीतरी अधून मधून,

आता नसतो मी जात, 
दोन दोन तास फिरायला,
मी गेलो की तुला, 
कारण मिळायचं ओरडायला,

मित्र म्हणाला म्हणून, 
घेत नाही टपरीवरचा कटींग
वेळेवर येतोही घरी, 
करत नाही लेट नाईट मिटींग
..
..

तुला जे जे आवडायचं नाही,
ते ते सगळंच थांबवून टाकलंय
तुझ्या आठवणी जगतोय, म्हणून
सध्या आयुष्यही लांबणीवर टाकलंय
..

फक्त थोडा उशीर झालाय.... 
इतकंच.... 

एकदा सांग ....


माझ्या आठवणीतील रंगीत वाटा
तुझ्याही स्मरणात असतील का ?
माझ्या पायात रुतल्यावर काटा
तुलाही कळ पोचत असेल का ?

आणि असे काही नसेल
किंवा नजरेआड झाल्यानंतर
स्मरणाआडही झालो असेल मी......
तर, मी हे शरीर सोडताना पाण्यात

एकदा शेवटचे सांग ....
..
..

तुझे गाव या प्रवाहाआड असेल का ?

मंगळवार, २७ जुलै, २०१०

मी नाहीये, मी नसेन कदाचित,

मी नाहीये, मी नसेन कदाचित,
या जगात, अस्तित्वात..
माझा चेहरा आठवतही नसेल बहुदा,
माझी एखादीही गोष्ट,
नसेल तुझ्या स्मरणात...

तरीही ये तू चालत, मी मेल्यानंतर
एक अनामिक कबरीजवळ...
अनामिक यासाठी की तिथेही नसेल माझे नाव
असलीच तर असेल,
तुझ्या आठवणीवरची एखादी कविता

ती वाचून,
धुसरल्या जर काही पुसट भावना
अनवधानाने डोळ्यांच्या पापण्यांवर...
तर अश्रू न मानता,
जपून ठेव माझी आठवण म्हणून...

;;
;;

पण जर का पाणावले नाहीच डोळे तुझे
तर मात्र माझ्या कबरीची चिता करून टाक...