फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ३० जुलै, २०१०

भर पावसात जेव्हा तीही तुझ्यासाठी रडेल..


उल्हासित होते मन सर्वांचे
वर्ष ऋतूच्या आगमनाने
चातकाची ही तहान भागते
येणाऱ्या पावसाच्या त्या सरीने

झाडानाही नवीन पालवी येते
नवीन आयुष्याची संधी देते
मातीही ती सुगंधित होते
वर्षा ऋतूचे जेव्हा आगमन होते

असतो एक चालत पावसात त्या
एकांतात अन आपुल्या विचारात
नाही भान जगाचे त्याला नाही स्वतचे
कोणास ठाऊक आहे जगत तो कोणत्या जगात..

चुकांचे तिच्या खापर त्याने
स्वताच्या माथी आनंदाने फोडले
सुखाला तिच्या दारी पोहचवता
डोळ्यांनी रक्ताचे अश्रू ते ढाळले,,

भर पावसात चालतो तो एकटा
लपवूनी चेहरा जगापासून स्वताचा
दुख ते पाहण्यास वेळ कोणाकडे असते
पावसाच्या सरींत अश्रूंनाही किंमत नसते..

रडशील किती अजुनी तू रे वेड्या
आहे सुखी ती.. तोड तू स्वताच्या बेड्या
तुझ्या प्रेमाची किंमत एकदा तिला कळेल
भर पावसात जेव्हा तीही तुझ्यासाठी रडेल....तुझ्यासाठीच रडेल...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा