फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ५ मे, २०१०


काल माझी मैत्रीण,
माझ्यावरच रूसली,
गुलाबी गोबरे गाल,
उगाच फुगवून बसली

निमित्त हवे होते तीला,
माझ्यावर रुसण्याचे,
मिठित घेवून लाड करीन,
म्हणून मुद्दामून पाठमोरी व्हायचे,

आरोप होता तीचा नेहमीचा,
की मी तीच काहीतरी चोरलयं,
तिच्या ह्रिदयाच्या मखमलावर,
प्रेम नावाच अक्षर कोरलयं..

हा गुन्हा तर मी केला होता,
म्हणजे तीला शरण यावेच लागेल,
नुसती माफि मागून,
तीची घट्ट मिठिची अपेक्षा कशी भागेल..

थोडसं उशीराच का होईना,
मी तिला शरण आलो,
डोळे मिटून गुडघे टेकवून,
माझ्याशी लग्न कर.. म्हणालो..

तेव्हा पासून ती आता,
कधीच रुसत नाही,
अन तिच्या गोर्‍या गालानवरची खळी,
कधीच नाहीशी होत नाही..