फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, २६ जुलै, २०१०

आपलीशी वाटणारी व्यक्ति सुद्दा

आपलीशी वाटणारी व्यक्ति सुद्दा 


मधेच सोडून जातात

विश्वास सम्पादन करून

विश्वासघात करतात

कधीच भरणार नाही असे

घाव मनाला देवून जातात

सोबत घलवितात फ़क्त

मोजकेच दिवस

पण आयुष्यभर विसरणार नाही

असे आठवणी देवून जातात

प्रेम केल होत मी तुझ्यावर

मला सोडून तू कशी काय राहशील

आज मी जिथे तुझी वाट पाहत आहे

उदया तूच तिथे माझी वाट पाहशील 

आता तु नाहीस म्हणून काय झाले........


आता तु नाहीस म्हणून काय झाले
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत
तुझ्या बरोबर राहीलेल्या
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या
पाऊलखुणा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत
त्याच स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे
याच प्रेरणेच्या जोरावर
आज उंच भरारी घेत आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे
गर्दीत उभा राहूनही एकट्यानेच
तुझीच वाट पहात आहे ....

सांग आठवण आली की काय करायचे?


नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोण समजावयाचे?
सांग आठवण आली की काय करायचे?

तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सांग आठवण आली की काय करायचे?

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

फोन मात्र मीच करायचा,
How.....R... U मात्र तू बोलायचे,
तु दिसलीस की डोळे भरून पहायचे,
ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

तू अशी अर्ध्यात सोडून गेल्यावर मी कुणाकडे पहायचे?
तू पुंन्हा येशील की नाही असे असं तरी मी कुणाला विचारायचे?
सर्व असूनही आज तुझी कमी जीवनात भासते, असे तरी मी कुणाला सांगायचे.?
सांग आठवण आली की काय करायचे.....?

प्रेम एका मनाचं....


सखे, आज माझ मन खुप बेचैन झालय,
तुला डोळे भरून पाहण्यासाठी ते आतुर झालय,

असा एकही दिवस नाही की ज्यात
तुझी आठवन आली नाही,

एका क्षणात तू जवळ भासतेस तर
दुसरया क्षणी तू कुठे हरवतेस ??
पावसात भिजताना सुद्धा तूच का आठवतेस ??

का सखे??? का तू अस माझ्या मनाशी खेळतेस ??
आपलस करून दूर का करतेस???
खर सांग ना ग... तुझ मन माझ्यासाठी
तुला असच छळत का??