फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १९ जुलै, २०१०

माझी न होता ती गेली...


माझ्या ह्रदयाची होती ती राणी,
जिला वाहिली मी प्रीत दिवाणी...

परिसापरी मज स्पर्शुनी गेली,
जीवनी मोगरा फ़ुलवूनी गेली...

ह्रदयाच्या तारा छेडूनी ती गेली,
प्रीतीचे गान गाऊनी ती गेली...

श्रावणसरी बरसूनी ती गेली,
चांदणराती उजळूनी ती गेली...

रंगात तिच्या रंगवूनी ती गेली,
आयुष्य माझे बदलूनी ती गेली...

मला एकट्याला सोडूनी ती गेली,
कळेना का माझी न होता ती गेली...

मनाला असे

मनाला असे दुःख होते तुझ्या जायचे
किती काय राहून गेले .. सांगायचे

जुन्या वेदना श्रांत होणार नाही अता
जखमेवरी फुंकरी कोण घालायचे ?

मौनात कैशी जपावीत अश्रुफूले
कसे चार चौघात ओठांत हासायचे ?

रात्रीतही चंद्र ताऱ्यात दिसतेस तू
पुन्हा वाटते, हे असे काय वाटायचे ?

स्मरणातुनी शक्य नाही भुलविणे तुला
तुझी आठवे घेउनी येथुनी जायचे
तुझी आठवण होताच मन माझे चिंब भिजते, 
तुझ्या प्रत्येक भेटीचे खरे कारण विचारते 

नेहमी बहाणे बनव्याचे मन माझे, तुला भेटायला 
पण आज तेच माझ्याकडे वैऱ्यासारखे पाहते 

आत्ता विचार करून काय फायदा 
तरी ते तुझ्या सालामातीची दुवा देवाकडे मागते 

जेथे असशील तेथे सुखात राहा कारण, 
तुझ्या मागे माझे वेडे मन पळते ...