...तेव्हा काय करावे?
सगळेजण भोवती असुनही एकट वाटतं तेव्हा काय करावे?
कोणाशी बोलावसे वाटुनही बोलता येत नाही तेव्हा काय करावे?
मनाचा बांध फुटतोय, रडावसे वाटते तरी रडता येत नाही तेव्हा काय करावे?
एखादी गोष्ट करावीशी वाटते पण करता येत नाही, कोणी करु देत नाही तेव्हा काय करावे?
स्वत:च्या प्रतिमेत अडकले असेल तेव्हा काय करावे....?