फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २२ डिसेंबर, २०१०

फक्त मिठीत घे...!!

फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे...
एखाद्या संध्याकाळी मनात वादळ उभ राहिल्यावर..
फक्त मिठीत घे...
सगळी दुनिया विरोधात असल्यावर..
फक्त मिठीत घे...
जगण्याची लढाई लढताना खुप थकल्यावर..
फक्त मिठीत घे..
जगण्याची इच्छाच मरून गेल्यावर...
फक्त मिठीत घे...
मरणाच्या आधी दोन क्षण...
फक्त मिठीत घे....
फार काही नकोय ग तुझ्याकडून...
फक्त मिठीत घे..!!!
फक्त मिठीत घे...!!!
दररोज घरी येता जाताना
नजरेत तुलाच शोधायचे ,
आणि कधी तू दिसलीस तर
आपोआप ओठांवर हास्य उमलायचे ,
दिवसभर college असल्यामुळे
तुला फार काळ न्याहाळता येत नव्हतं,
पण जेव्हा केव्हा समोर येशील
तेव्हा नकळत हात तुला hi करण्यासाठी उठायचे,
एके दिवशी बोलता बोलता
मनातल्या feelings बोलून गेलो,
आणि त्यातूनच एक
सुरेख नाते जन्माला आले,
बरेच दिवस झाले
दोघे सुखात होते,
पण अचानक काय झाले माहित नाही
पण तिने बोलणे बंद केले,
तिच्या अशा वागण्याने
त्याने खूप सोसले,
पण मग हळूहळू स्वतःला सावरले ,
 आणि पुन्हा एकदा नव्याने जगणे सुरु केले,
लोकांचा नजरेत आता तो खुश होता,
पण मनात मात्र एकच आस होती,
एकदा ....एकदा तरी परत येशील का माझ्याकडे ,
पुन्हा एकदा अनुभवायला त्याच प्रेमाचे गोडवे. 
मनापासून ती खूप आवडते मला
तिच्या मनातलं, पण माहीत नाही
मी दिलेल्या फुलांपैकी एकही फुल
तिच्या हृद्याच्या वहीत नाही

श्वासाहून जास्त तिचे विचार येतात

ती विचारांच्या भानगडीत पडत नाही
म्हणते "मी भावनांच्या कुशीत गवसते"
पण विचारांच्या मिठीत सापडत नाही

डोळे तिचचं चित्र रेखाटतात

तिच्या डोळ्यांचं सांगू शकत नाही
दिसतो तिथे अधून मधून तसा
पण काजवा होऊन चमकत नाही

प्रत्येक स्वप्नात ती हजेरी लावते

तिच्या स्वप्नांचं सांगता येत नाही
समुद्राच्या वाळूत घर बांधायला
अजून तिचं मन तसदी घेत नाही

कदाचित तिच्या प्रेमात मी बुडतोय

ती बुडत असेल पटत नाही
दोघांच्या मनात एकसारखी क्रिया
घडत असेल असं वाटत नाही