फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २९ एप्रिल, २०११


माझ्याकडे पाहात जेंव्हा
शांत निघून जातेस,
अश्रू भरल्या डोळ्यानीच
सर्व सांगून जातेस,
माझ्या प्रेमाची उणीव तुला
...सतत भासवत राहील
काही क्षण का होईना पण
माझी आठवण येत राहील,
माझ सोड काही नाही
तू स्वताला जपत जा
रोज रात्री स्वप्नात मात्र
एकदा तरी येत जा,
मी आता जगतोय खरा पण
फक्त खोट्या आशेवर
तू येशील म्हणून आणखीन हि उभा आहे
तुझ्या त्याच परतीच्या वाटेवर ...........