फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, १ जून, २०११

सवय अजूनही आहे.....


.

तू निघून गेल्यावर तुझी वाट पाहण्याची,
सवय अजूनही आहे......

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!
अशीच ऐके दिवशी तू विचार करत बसशील.................,
जवळ कुणीच नसेल तेंव्हा माझीच आठवण काढशील................

पण वेळ निघून गेलेली असेल, 
परतीच्या पाऊल खुणा तू स्वताच पुसून टाकलेल्या असशील........

एकत्र घालवलेला वेळ आठवण्याचा पुन्हा प्रयत्न करशील.............
आठवेलही तुला सर्व काही, 

पण गेलेली वेळ आणि ते क्षण पुन्हा परत कशी आणू शकशील...?