फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

प्रेमात कधी पडू नकोस..


ऐक सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस...

प्रेम व्यर्थ आहे, प्रेम पाप, प्रेम म्हणजे स्वातंत्र्याला शाप...
गुप्ततेचे ओझे मनावर, मानगुटीवर तिचा बाप...

प्रेम अग्नी, प्रेम युद्ध, प्रेम म्हणजे वेडेपणा शुद्ध...
मागावर तुझ्या नेहमी, भाऊ तिचा निर्बुद्ध...

प्रेम म्हणजे विरह, प्रेम म्हणजे भ्रमवारा...
मित्रांशी संबंध तुटणार, मैत्रीपासुन दुरावा...

प्रेम म्हणजे दिवास्वप्ने, प्रेम म्हणजे जागरण...
आपल्या आवडी-निवडीवर बदलाचे आक्रमण...

प्रेम म्हणजे बंधन, प्रेम म्हणजे पाश...
पैशांचा होतो खुर्दा, अन वेळेचाही नाश...

म्हणुन सांगतो मित्रा, प्रेमात कधी पडू नकोस...
पडलास जर एकदा, तर नशीबावर मात्र रडु नकोस

पहिले प्रेम.......


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.


क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.


स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.


जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.


जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला 
एकरूपता तरी जाणवेल बघ.


नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स

अजूनही तू हवीशी वाटतेस


का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

तुझे हात पहिले की ,
कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते
तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत
अगणित गोष्ट आतःवत राहतात

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
आणि मग पुढे,मी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू
अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....

वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील
कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून
रात्रभर बसली असशील
झोपेची वाट बघत,
मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....

कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला
माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख
शेवटी काळ हे जालीम औषध असतं
" असल्या " जखमांवर ...
किंवा नसेलही कदाचित .....

का अजूनही तू हवीशी वाटतेस
" एवढं " सारं झाल्या नंतरही ....