फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

बर झाल तू गेलीस सोडून मला ते


बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर
भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची
आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची
आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge
आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या
आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "
आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला
आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची
आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला
आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य
करतोय मी माज्या career चा विचार
आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी
स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,
येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,
२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस
आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?
आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,
१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे
नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!
थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!
आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!
तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!


" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,
आता डोक्याला कसलंच tension नाही आहे "

खरोखरच मी कविता लिहिली का ?

कविता करण्याचा विचार मानत कधीच नव्हता
आणि कधी केलीही नव्हती
प्रेम करण्याचा विचार ही मनात कधीच नव्हता
आणि ह्या पूर्वी कधी केलही नव्हत
तरीही तिच्या सोज्वळ स्वभावाला भुलून मी तिच्या प्रेमात पडलो
तेव्हा अनुभावल की 'प्रेम करायच नसत ते आपोआप होत'
पण मी आयुष्यभराचा विचार करताना तिला आठवडा च पुरेसा वाटला
जाता जाता माझ्या मनात ती दुःखाचे डोंगर उभारून गेली
कुणाच्या माथि मारायचे हे डोंगर , कोणाला सांगायचे हे दुःख ,
हा विचार मनात असताना समोर १ कागद दिसला
आणि मनातल दुःख कागदावर शब्द म्हणून उमटल
मनाचा भार हलका झाला
आज जेव्हा हा कागद तुम्ही वाचलात आणि जी प्रशंशा केलात
तेव्हा मला ह्याची जाणीव जाली की ती माझ्या मनातील भावना १ कविता जाली आहे !!!
धन्यवाद !!!

तुझ्याचसाठी .........

देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
-
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
-
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
-
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
-
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||
-
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
-
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
-
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
-
आज सारे विसरली तू
नावही  येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
-
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
-
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
-
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
-
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
-
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाहीकधी रडु लागलो...
-
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
-
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?