फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ३१ जुलै, २०१०

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी...

एकांतात जवळ येऊन,हळूच रडायला सांगतात
रडताना तुला आठवायला,पुन्हा पुन्हा भाग पडतात

त्या असतात तुझ्या आठवणी ....डोळ्यांची कवाडे बंद ठेवली तरीही
मनातून डोळ्यात प्रवेशतात
आणि पुन्हा गालावर घरंगळून
आपली उपस्थिती दाखवतात

त्या असतात तुझ्या आठवणी...रात्रीच्या जीवघेण्या गडद एकांतात
मला अंधुकश्या आनंदाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात
आणि वास्तवाशी फारकत घेतलेल्या
मस्तवाल आठवणींसोबत जरा वेळ घालवल्यावर
पुन्हा एकदा मनातल्या कोपऱ्यात जाऊन बसतात

त्या असतात तुझ्या आठवणी...
तुला विसरण्याच्या प्रयत्नात असताना..
क्षणाचीही उसंत न देता,
तुझ्याकडे शिळ घालून बोलवणाऱ्या
आणि पुन्हा एकटाच चालायला लावणाऱ्या

त्या असतात तुझ्या आठवणी...

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी....

सगळे विचारतात...

सगळे विचारतात...


"अशा कशा रे तिच्या आठवणी सगळ्या दुखः द ?
एखादी ही नाही का हसरी....?"


"ती हसायची,
तेव्हा माझ्या सोबत असायची,
आणि ती असायची तेव्हा
तिची आठवण नसायची....

आता ती नाही तर आठवण आहे,
..
..
..

अजून आठवतंय....

ती जाताना वाचले होते मी तिचे डोळे, 
ती पुसत होती जरी,
ती दिन रात रडत असताना, 
तिची आठवण तरी कशी येईल हसरी ?"

सांगा ना....

मी तुझी "सावली" आहे म्हणून ..

काल दुपारी एक वेडा पाहिला
कधी हसायचा कधी रडायचा
कधी चालायचा कधी थांबायचा
.
डावीकडे , उजवीकडे कधी 
कधी सरळ मागे कधी
चाले कधी धावे कधी 
कळे न काय शोधी नक्की 

मधेच फतकल मारून बसायचा 
हाताच्या मुठी आवळून जमीन बडवायचाकदाचित तो स्वताच्या सावलीपासून 
पीछा सोडवू पाहत होता ..
.
मग मी तुझ्या आठवणींपासून 
दूर धावणे थांबवले..
कारण
एकदा तू म्हणालीस होती
मी तुझी "सावली" आहे म्हणून ......

आज जरा जास्तच भरून आलंय,

आज जरा जास्तच भरून आलंय,
आभाळासारखे मन
आज पुन्हा नव्याने टोचतंय जुनंच,
पण अस्तित्वात नसलेलं ऊन 

नेमका कुठे चाललोय मी
घेऊन, ओढत फरपटत स्वतःलाच

कदाचित शेवटचाच प्रवास असावा हा,
कारण रस्ता तर नाहीयेच,
नुसत्या स्मरणद-या दिसताहेत ....
खोलवर... खोलवर... खोलवर...
.
.
.

झोकून देईन स्वतःला दरीभर
तेव्हा मिटतील सा-याच स्मरणव्याधी
मग बनेल तुझ्या आठवणींच्या खाईत
माझ्या उध्वस्त प्रेमाची समाधी

रांगाच्या रांगा लाऊन

रांगाच्या रांगा लाऊन
उभ्या आहेत तुझ्या आठवणी

तिकीटबारीवर असतात ना तश्या....
एका पाठी एक.

नक्कीच त्या मला पुरतील आयुष्यभर...
पण तोवर मी उरेल की नाही, कुणास ठाऊक ?

उरलो तरी आज इतकाच,
झुरेल की नाही कुणास ठाऊक ?
..
.

कारण......
तेव्हा माझ्या वयाची दीर्घता जास्त असेल
की तुझ्या आठवणींची तीव्रता.....

कुणास ठाऊक ?

तू दूर दूर जाता...


तू दूर दूर जाता मी एकटाच राहीलो,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहीलो...
तू अशी निघून जाता मी मलाच हरवून बसलो,


ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले,
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...

आठवते का ग तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी, अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...

मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता माझ्या मनी...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का ग?
एकच सांग मला की तू परत येशील का ग?