आज जरा जास्तच भरून आलंय,
आभाळासारखे मन
आज पुन्हा नव्याने टोचतंय जुनंच,
पण अस्तित्वात नसलेलं ऊन
नेमका कुठे चाललोय मी
घेऊन, ओढत फरपटत स्वतःलाच
कदाचित शेवटचाच प्रवास असावा हा,
कारण रस्ता तर नाहीयेच,
नुसत्या स्मरणद-या दिसताहेत ....
खोलवर... खोलवर... खोलवर...
.
.
.
झोकून देईन स्वतःला दरीभर
तेव्हा मिटतील सा-याच स्मरणव्याधी
मग बनेल तुझ्या आठवणींच्या खाईत
माझ्या उध्वस्त प्रेमाची समाधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा