फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ८ जून, २०११


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

खास तिच्यासाठी




तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
तू गेल्यावर एकटा एकटा खूप रडलोय,अजूनही रडतो.
कधी ऑफिस मध्ये जाताना रस्त्यात,कधी ऑफिसमध्ये विचार करताना,
कधी रात्री आठवणी काढताना,कधी एखादे गाणे ऐकून, तर कधी रस्त्या वरची इतर कपल बघून.
एक एक शब्द आठवतो तुझा,आताही लिहिताना डोळ्यात पाणी आहेच......
त्या पाण्याचे वाईट वाटत नाही पण माज्या रडल्याने तुला काहीच फरक पडत नाही ह्या विचारानेच जीव जातोय.
गुदमरतोय जीव माझा.जाऊन कुठे तरी जोरात किंचाळावेसे वाटतंय.
रड रड रडावेसे वाटतंय.सगळे जड जड झालंय.
कधी कधी वाटते कि तू असे केलेस त्यात तुजी काहीच चूक नाही आहे,मीच वाईट असणार.....
पण इतका पण वाईट वागलो नसेन ना मी तुज्याशी?
एकदा पण विचार नाही केलास नाहीस ना माझा????
त्या समुद्र किनार्या वर कधी जाऊ नकोस,
कारण माझ्या पेक्षा तो समुद्र जास्त रागावला असेल तुज्यावर......
....
..
अगं आता नाही करत पण एका क्षणासाठी का होईना कधी तरी प्रेम केले होतेस ना माझ्यावर?
विश्वास उडत चाललाय सगळ्या वरचा
खूप काही बोलायचेय.....
खूप प्रश्न विचारायचेय्त......विचाराय्चेय कि का वागलीस अशी माझ्याशी?
पण माझ्या बोलण्यात आता तुला इंटरेस्ट नसेल आणि
माझ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस तर ती ऐकण्याची माजी हिम्मत नाही आहे
पण
आता
इतका राग नाही राहिलाय
उलट अजून प्रेम वाढलय
असेच वाढू दे अशी इच्छां आहे......
अजून हि खूप प्रेम करतो तुज्यावर
तू नको करूस कधी पण मी करेन नेहमी
....
....
....
जिथे पण जाशील,ज्याच्या बरोबर राहशील खुश रहा.....
दुसरे कोणी नाही तर एक कोणी तरी आहे तुज्यासाठी देवाकडे मागणारा...
कधी तरी खूप रडावेसे वाटेल......
अगदी खुप..
तेव्हा आठवण येईल माझी.....
खुश रहां