फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही..........

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस 

माझ्या मनाच्या अंगणात रिमझिमणार नाही......

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११


माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता..

तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ…

चंद्राचे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..

मला सोडून जातेस,
खुशाल निघून जा,
पण जाण्या अगोदर…
माझ्या मनावर कोरलेले तुझे नाव पुसून जा….

जीवनाच्या अनोळखी वाटेवर,
तू मला भेटलिस,
लाडीक हसून,
माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

कालच माझी अंत्ययात्रा निघाली...

मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..
वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..
उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...
तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..
एक दिवस हिम्मत करून विचारले..
तिने माझ्या प्रेमाला नाकारले..
माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...
अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..
कालच माझी अंत्ययात्रा निघाली...
ती कुठेच दिसत नव्हती...
म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..
मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..
जाता जाता मला ती बघायला भेटेल...
तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..
माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...
सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..
तीला तिची चुक उमगली होती..
म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती.........

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे

आता मलाच भीती वाटू लागली माझी
सरू लागली दूर सावली तुझ्या आठवणीची

मन खंतावते, कोसते का झुरावे तुझ्यासाठी
ना आहे मनात आठवण... ना तुला गरज माझी
रमलीस तू वेगळ्या विश्वात विसरुनी पाऊलखुणा
मीच रेंगाळत राहिलो इथेच सोशीत विरह यातना
आज पहिले तुला... होती नजर अनोळखी अशी
भेटलेच नव्हतो कधी जन्मात होते कुणी परकी
नाहीस आता माझी तू कळतच नाही कळूनही
डोळ्यात पाणी उभे.. वेदना मनीची सरत नाही
आता या वळणावर मजला दूर व्हायला हवे
विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे...

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...
प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?

नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?
जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?


चुक झाली माझी
चुक झाली माझी की मी तुझ्यावर प्रेम केले...
सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?
नको ढाळुस अश्रु आत्तानको ढाळुस अश्रु आत्ताऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...

बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...
आज रहाशील गप्पंआज रहाशील गप्पंतुझ्या कडे ऊत्तर नसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...
ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०११

नाव यमा कड़े बुक केलय

तिच्या विरहात जगन आता
खुप मुश्किल झालय
म्हनुनच माझ नाव
यम देवाकड बुक केलय
नाही उरली जगण्याची इच्छा
मला आता दूर जायचय
या खोट्या दुनियेत
मला अजिबात नाही रहायच
अहो आज पर्यन्त ती
खुप प्रेम करत आली
अचानकच मला फसउन
दुसय्रा बरोबर गेली
"तू माझ्याशी लग्न नाही केलस तर
मी जिवच देंइन" अस सारख बोलायची
म्हनुनच मला सवय झाली
प्रतेक स्थळ नाकारायची
घरचे सगले रागवायचे
गावातले लोक नाव ठेवायचे
पापा आणि आई रोज
टेंशन मधेच असायचे
माझ्या बरोबरच्या मुलांची मूल
शाळेत जाऊ लागली
आणि आमची लग्न पत्रिका अजुन कोनाशिच
न्हवती जुळली
आता नाही करायच लग्न मला
ना आता जगायचय
या धोकेबाज लोकांपासून
मला दूर निघून जायचय
खरच तुझ्या विरहात माझ जगन मुश्किल झालय
आणि जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय
जड़ अंत:करनाने नाव यमा कड़े बुक केलय


सोमवार, १ ऑगस्ट, २०११

कधीच न्हवत वाटल मला
कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडल
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडल
नेहमी मला म्हणायची ती
डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठउन तीच बोलन खुप खुप हसायचो
आणि येनारया प्रतेक स्थलाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस एम एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलान्नी
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे चारतेय पाहून
भाराउन च गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती

स्वप्न


तुझी साथ हवी होती मला आयुष्यात
खूप स्वप्न पहिली त्यासाठी
पण डोळे उघडले आणि स्वप्ने तुटली
नेहमी असेच का होते
स्वप्न हे स्वप्नच बनून का राहते

स्वप्नांना सत्याची जोड का नसते
जे काही असते ते सगळे खोटे असते
कारण स्वप्न हे स्वप्न असते
त्यात काही सत्य नसते

प्रेम माझे खरे होते तुझ्यावर
पण नाही सांगू शकलो कधी तुला
कारण तेव्हा मी स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्याबरोबर रमत होतो

आज त्या गोष्टीला खूप उशीर झाला आहे
हातातून सगळ्या गोष्टी निसटून गेल्या आहेत
तरीही मी अजून स्वप्नांच्याच दुनियेत आहे
कारण जे सुख सत्यात नाही
ते स्वप्नात आहे

आज खुप रडाव वाटतय


 
माहिती नाही का ??
पण आज खुप रडाव वाटतय...


आईच्या कुशीत जावून झोपाव वाटतय
धावपळीच्या जीवनात , सुटली अनामोल नाती मागे
माहिती नाही का??
आज ती सगळी नाती पुन्हा एकदा जोडावी वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


केंव्हातरी ह्या गर्दी मध्ये गवसल होत कोणी माझ
माहिती नाही का??
आज त्याला परत शोधून आणाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


रोज स्वप्नातच जगते मी
माहिती नाही का??
आज त्या स्वप्नाना दूर सारून वास्तवात याव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


रोज स्वता:शी खोट बोलते मी
माहिती नाही का??
आज स्वत:ला सगळ खर सांगव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


माहिती नाही का??
तुटलेल सार पुन्हा परत जोडाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय.......
माहिती नाही का??
पण खुप खुप रडाव वाटतय !!!!!!!