फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

होता एक वेडा मुलगा


होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा,
अगदी माझ्यासारखा

स्वप्न!!!!


मला जगायच स्वप्नात तुझ्या सोबत,
जे तू स्वप्न दाखवल त्यात बसवायच मनाला.
तू दाखवलेल्या स्वप्न फ़क्त मनराखीचे होते,
कारण त्या स्वप्नात तू कधीच मानाने अलीच नाही.
तू दाखवलेल्या स्वप्नात मला हरावयाच आहे,
त्यातच आयुष्य जगायच आहे. 
तुझ्या दाखवलेल्या स्वप्नातील 
प्रत्येक क्षण साठवण करून
त्याला जोपासयच आहे ,
स्वप्न कस असल तरी त्यात तुझ प्रेम,
तुझा रुसवा फुगवा , तुझा भांडनारा चेहरा आणि 
मला खुप खुप जवळ घेणारा तुझा भाव होता 
अस स्वप्न पाहिल मी तुझ्यात ,
जिथ तू खोटी खोटी का होइना माझी होती 
अन मी एकदम खरा खुरा तुझा ,
तू दाखवलेल्या स्वप्नात एवढा एवढा गुंतलो की,
ते कधी तुटेल अणि चालता श्वास बंद होइल याची कल्पना देखिल कधी करवेना
तरीही सगल्या भावना बाजूला रचून स्वप्न विनायाला घेतल ,
या स्वप्नात आयुष्य काढता येत नाही पण या स्वप्नात माझ सार आयुष्यच व्यापून टाकल.
कधी नवरा-बायको तर कधी आई-बाप 
कधी बाप-लेक तर कधी माय-लेक आसा संवाद 
आयुष्य व्यापेचा साक्षीदारच जणू .
मी तर स्वप्नानाच माझ अस्तित्व बनू लागलोय 
स्वप्नात तू अणि मी असुनही कधी जुलाले नाही 
स्वप्न तुटेल तर नक्कीच श्वास ही तुटेल

तिचेच प्रतिबिंब दिसले.....

झोपेत पाहायचो स्वप्नसुंदरी

साक्षात आयुष्यात ती आली
येउनी बेरंगी जीवनात माझ्या
रंगांची उधळण करुनी गेली..

फुलासारखी नाजूक अशी
कोमल हास्य तिच्या गाली
होते वाटत स्वर्गात मी जणू
अशी अप्सरा मला मिळाली..

नव्याचे ते नऊ दिवस संपले
अप्सरेचे खरे रूप दिसले
टाकला होता ओवाळूनी जीव जिच्यावर
तिनेच हृदयाचे तुकडे केले..

देऊनी सर्वस्वी प्रेम तिला
दोषी अखेरीस मला ठरवले
प्रेमाच्या बुडत्या नौकेला होतो वाचवीत
अथांग सागरात मलाच बुडविले..

केले वार अनेक हृदयावरी त्या
रक्ताचे अश्रू हृदयातूनी ढळले
प्रेम माझे कधी न जाणलेस
रक्तात हि तिचेच प्रतिबिंब दिसले...तिचेच प्रतिबिंब दिसले...

रंग बदलेस म्हणून

उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे

उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

“सणाला तरी हसत जा” तु अस म्हणशील”
बाहेरच जग पाहत जा” तु असही म्हणशील
“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा” तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय