फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

मी स्वतः तुझ्यावर केलेली लास्ट कविता

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..

एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..


कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..


पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...

शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!


आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?

कदाचित हो असेल तुझ उत्तर...

पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..


होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..

पण वेळ गेल्यावर काय करणार..

त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!


आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..

पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि

कि

कि

तू खुश तर आहेस ना!!