फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.........

नाती

जीवन वाटेवर अनेक जुळतात नाती
काही कोमेजती,काही फ़ुलतात नाती...
दु:ख देती तसेच सुखावतात नाती
कुणास आयुष्यभर छळतात नाती...

वात्सल्य,प्रेम,मायेत झुलतात नाती
विश्वासाने हळूहळू खुलतात नाती...
कुठे हरवती कुठे मिळतात नाती
क्षणिक स्वार्थापोटी भुलतात नाती...

हातात हात घेऊनी चालतात नाती
सुखात जवळ दु:खात पळतात नाती...
काही पणती सारखी जळतात नाती
कायमची ह्रुदयाला काही सलतात नाती...

मनात जरी रुजतात नाती

प्रेम, मायेने हसतात नाती...
अविश्वास होता थोडासा
एकमेकांवर का रुसतात नाती...?

काही वळणावर हरवतात नाती
स्वार्थापोटी मिरवतात नाती...
आपुलकी कुठे असते हल्ली
माणसे कुठे टिकवतात नाती...?

घास प्रेमाचा भरवतात नाती
धडा नात्यांचा गिरवतात नाती
गैरसमज मनात जागता थोडासा
कायमची का दुरावतात नाती..?