फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

भेट

कसे सांगू तुजला भेटीने तुझ्या
किती आनंद मिळतो माझ्या मनास
सरितेला आलिंगन देताना
होत असेल जेवढा सागरास

मखमली स्पर्श तुझा
अंगावर एक वेगळाच रोमांच फुलवतो
तुझ्या डोळ्यात माझे प्रतिबिंब पाहून
मी मात्र खूप सुखावतो

वेळ अतिशय हळू सरावी
हीच बाळगून असतो मनी आस
काही क्षणांनी दूर जाणार आहेस
ही जाणीव मात्र देते त्यावेळी खूप त्रास

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण
मी ठेवत असतो मनात साठवून
नसतेस सोबत तेव्हा मग
झोपतो त्यांनाच उराशी बाळगून

अलिप्त होताना तुझ्याकडे मला
पाहावल ही जात नाही
दुखी असताना हसर्‍या चेहर्‍याने
निरोप देण मला तरी जमत नाही
प्रेम म्हणजे,
दोघाच सुंदर स्वप्न असत,
प्रेम म्हणजे,
तु आणि मी नाहि,
प्रेम म्हणजे "आपण" असत,
प्रेम म्हणजे,
एकाच रुसण तर,
दुसऱ्याच समजावण असत,
प्रेम म्हणजे,
दोन जिव एक असण असत...