फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील 
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

खरच

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???

आई ने विचारले

काल बोलता बोलता अचानक तुझा विषय निघाला
आई ने विचारले "आता काय करते रे ती ??"
नकळत पणे पापणी ओली झाली
इकडे तिकडे बघून पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हि झाला
"नाही माहित" म्हणून वेळ मारून नेली
सांगू तरी काय तिला ?
सोबतचे क्षण ? केलेल्या आणाभाका ? दिलेल्या शपथा?
कि तुझ्या लग्नातील शेवटची भेट ?

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

गरज आहे आज मला
तुझ्या त्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या त्या तुझ्या हातांची..

गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितिची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची..
सारे जग असुरक्षीत वाटताच
तु जवळ आहेस या जाणीवेची
खरच गरज आहे रे आजहि मला....
तुझी....

माझ्या जीवनात अजुन
तुझी कमी वाटते.... :(