फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

"तीच प्रेम लहरी,
न सांगताच रुसनार.

माझ प्रेम मात्र निरागस,
तिच्या गालावरचा एक एक अश्रु पुसणार.


तीच प्रेम हट्टी,
वाट्टेल तस वागणार.

माझ प्रेम मात्र सोशिक,
तिची चुक असुनही मान ख़ाली घालून माफ़ी मागणार.


तीच प्रेम भित्र,
कायम दुरून मजा पाहणार.

माझ प्रेम मात्र निर्भिड,
आख्या जगाच्या विरोधात तिच्या पाठी उभ रहाणार.


तीच प्रेम हुशार,
पावसामधे स्वतः साठी आडोसा बघून वाकणार,

माझ प्रेम मात्र वेड,
तिला उन लागु नये म्हणून दोन्ही हातानी सारा आसमंत झाकणार.


तीच प्रेम स्वार्थी,
माझ्यापासून दूर जाण्यासाठी भांडणार,

आणि माझ प्रेम हिरमुसलेल,
तिने मोड्लेला डाव पुन्हा पुन्हा मांडणार....!"

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११


आजही आठवतोय मला
त्या आभाळाचा प्रकोप
कोसळणा-या पावसात
तो तुझा अखेरचा निरोप ...
काळजावर दगड ठेउन
मी जा म्हणालो आणी तु गेलीस
एकदाही मागे न वळता
आयुष्यातुन कायमची हरवलीस.
तुला रोखू कसे मला सुचलेच नाही
पावसात गळणारे माझे डोळे
तुला दिसलेच नाही ...
मी स्तब्ध होतो पण
काळीज मात्र कींचाळत राहीलं
डोळ्यांसोबत ते आभाळही
रात्रभर गळत राहीलं ...
तु गेल्यावर हे आयुष्य वाळवंट
आणी मी ... मी निवडूंग झालो.
तो गाव कधीच सोडला
आणी वेशीवर बेधुंद झालो
आजही त्याच दिशेला
वेड्या सारखा शोधत असतो काही
डोळे भरून येतात खरे
पण आभाळ... आभाळ मात्र भरत नाही.

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

पुन्हा मी मिळणार नाही

मागून बघ जीव ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही...

तुझा झालो तेव्हाच मी
माझ्यासाठी संपलो होतो,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी,
तुझ्या बरोबरच जगलो आहे..
श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात
फक्त तुलाच तर जपले आहे,
मागून घे श्वासही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... 

तुझे माझे काय असते
कधी मला कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही कधी मला पडले नाही,
मागून घे स्वप्नेही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... 

स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी
म्हणून सार करत होतो
जमिनीवर उभे राहून
आकाशालही पकडत होतो
उघडून बघ मूठही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही.... 

ईतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे
मी सहन करणार नाही
मागून घे अंतही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही...
पुन्हा मी मिळणार नाही...

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

खरं प्रेम म्हणजे.......

खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.

खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.

खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.

खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.

खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.

खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.

खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०११

ती माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....


दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....


तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....


एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत नाही

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०११

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा,
आठवण तिची आल्यावर,
कविता करत बसायचा . . . .

कधी तिच्या केसात गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,

कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालावरगोड हसु आणायचा....

नेहमी काहीना काही उपमा द्यायचा,
आज परी तर उद्या सरी . . . .
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा....

पेनाची शाई संपली तरी शब्द संपेना, 
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा,

कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र द्यायचा....
कविता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून,
खुप गोड हसायची....

पण कविता तिला कधीच समजलीच नव्हती,
कारण प्रेम फक्त तोच करायचा....

आज नाही त्याच्या आयुष्यात ती,
तरी कविता करतोय....

एक आठवण म्हणुन,

एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा,
तिच्यावर खुप प्रेम करायंचा.

आज Valentine Day...

आज असशील तू त्याच्या सोबत
हातात गुलाबाचं फुल मिरवत
तेव्हा टोचतील कांटे ही
तुला माझी आठवण येण्या साठी


Greeting card असेल सोबत
त्यातील शब्द ही भिडतील मनाला
अगदी माझे भिडतात तसे
तुला माझी आठवण येण्या साठी


तो घेईल तुला जेव्हा मिठीत
तेव्हा बटनात अडकलेला केस
ही जाचेल आसा काही
तुला माझी आठवण येण्या साठी


जेव्हा बसाल तुम्ही एखाद्या हॉटेलात
लेमोन कोल्याचे घुटके घेत
तेव्हा लागणारा ठसकाही लागेल आसा काही
तुला माझी आठवण येण्या साठी


शेवट जरा असेल गोड
तो शोधात असेल ग्लास
तुझ्या डोळ्यात तेव्हा पाणी असेल
ते ही माझ्या साठी
ते ही माझ्या साठी .............

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल..
"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला



नाही जमणार तुला माज्यावर प्रेम करायला
जन्मोजन्मी वेड्यासारखी वात पाहायला
लाग आता लग्नासाठी मुलगा शोधायला
मलाच आहेर द्यावा लागेल तुझ्या लग्नाला!!!!!!!!!!!



नाही जमणार तुला एकनिष्ठ राहायला
कदाचित लागेल तुला उष्टं खायला
कारणीभूत ठरेल जे प्रेम वाढायला
मलाच यावं लागेल तुझ्या लग्नाला !!!!!!!



नाही जमणार तुला माझं मन सांभाळणे
नाही सहन होणार तुला माझं रागावणं
नाही आवडणार कदाचित माझं विचित्र वागणं
बेधुंद बेदरकार बेफिकीर असणारं माझं जगणं!!!!!!!



नाही कळणार तुला माझ्या मनाचा भाव
नाही घेता येणार तुला माझ्या हृदयाचा ठाव
नाही आवडणार कदाचित माझ्या प्रेमाचा गाव
वादळवाऱ्यात भर समुद्रात असणारी सुसज्ज नाव !!!!!!



नाही जमणार तुला माझ्यासोबत चालायला
आपली वाट आपणच शोधायला
हृदयातील दु:ख हृदयातच दाबायला
चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणायला !!!!!!!!!!!!



नाही जमणार हा एक जन्म माझ्या सोबत
स्वगत म्हण किवा व्यक्तिगत
सुदैव म्हण किंवा दुर्गत
मग सात जन्मांची काय गत ???

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

आठवणींचा पाउस होता.

कोण्या एका संध्याकाळी
नकळत तुझी आठवण आली
कैद करुनी ठेवलेल्या अश्रूंना
आज वाट मोकळी झाली...

अश्रूंना त्या सावरणे
आज मजसी कठीण झाले
टिपत होतो ओघळणाऱ्या अश्रूंना
अश्रूंतही तुझेच हास्य दिसले...

आठवणींत दडलेला प्रत्येक क्षण
अश्रूंत मी आज पाहत होतो
ना जाहले मलाही कधी
आसवां सोबत मी जगत होतो...

प्रेमाचा तो भावूक रंग
आजही जपून ठेवला होता
हाथात आहे हाथ तुझा
भास मजसी होत होता...

नात्यांच्या बंधनात साधलेला
दोर प्रीतीचा आज तुटला होता
सामोरी होता दिसत किनारा
तरीही सागरात आज हरवला होता...

डुबली होती नौका प्रेमाच्या सागरात
खोट्या आशेवर अजूनही जगत होता
होता दाटला अंधार काळ्या नभांचा
नयनात आठवणींचा पाउस होता...आठवणींचा पाउस होता...
मुका मीच झालो, स्मरले न काही
विसरूनी जा तू, तुझा दोष नाही

माझा मीच कसा भांबावुन गेलो
ना कळाले मला ,तुझा दोष नाही

मानले ना तेव्हा डोळ्यांचे इशारे
वेड हे माझेच तुझा दोष नाही

प्रतिबिंबही न उमटले तुझ्या प्रीतीचे
आरसाच फुटका , तुझा दोष नाही

सुटले ना भान ,ना ढळलो जराही
विसरलीस तू , तुझा दोष नाही 
मुका मीच झालो, स्मरले न काही
विसरूनी जा तू, तुझा दोष नाही

माझा मीच कसा भांबावुन गेलो
ना कळाले मला ,तुझा दोष नाही

मानले ना तेव्हा डोळ्यांचे इशारे
वेड हे माझेच तुझा दोष नाही

प्रतिबिंबही न उमटले तुझ्या प्रीतीचे
आरसाच फुटका , तुझा दोष नाही

सुटले ना भान ,ना ढळलो जराही
विसरलीस तू , तुझा दोष नाही