फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१३

तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?

माझ्या साठी फ़क्त आता
एवढच करशील का
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
.
तुझ्या लग्नामध्ये मी नक्की नक्की येइन
शेवटच्या दिवशी तुला मी
डोले भरून पहिन
.
तो दिवस माझ्या साठीखुप दुखाचा असेल
त्या दिवशी माझ्या कड़े पाहून हळूच हसशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का
.
तू नाही बोलवलस तरी
सुधा येइन तुझ्या साठी वेटर्स च काम मी करीन 
मी भरलेल जेवनाच ताट तू खाशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण
मला देशील का ?
.
तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल
त्या दिवशी मी मंगलष्टके गाईन
ती मंगलअष्टके खुप दूखाची असतील
ती ऐकून तू हळूच रडशील का ?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ?


. जसा सगळ्यांचा निरोप घेशील
तसा माझा सुधा घेशील का
डोळ्यात डोळे घालून मला
जाऊ का म्हणशील का ?
जस रोज take care ,
have a nice day गाड़ी सावकाश चालव
अस बोलायाचिस तस् बोलशील का
तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का ?
.
कदाचित तुझ लग्न मला
नाही होणार सहन माझ्या डोळ्यात माझ च
दिसेल मला मरण
मी मेल्यावर गुलाबाच फुल
माझ्या फोटोला वाहशील का?
तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का?

शनिवार, ६ जुलै, २०१३

फक्त तुझ्यासाठी...


आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....


तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.......!!

तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार ....


खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार...

विरह हा नाही सहन होत ग
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार
कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार....