फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

खरच मी चुकलो....!

"खरच मी चुकलो....?

तिच्या बरोबर काही पाउले चालताना,
आणि आमच्या नात्याची सांगड़ घालताना.
खरच मी चुकलो ?

वेड्या मनाला आवर घालताना,
आणि का कोण जाणे तिला नकळत जपताना.
खरच मी चुकलो ?

ढ़ासळनारा तो पत्त्यांचा बंगला बांधताना,
आणि दरवेळी शब्दाशब्दाने नविन डाव मांडताना.
खरच मी चुकलो ?

आयुष्याच्या पाना पानावरची कहानी तिला मनापासून सांगताना,
आणि जे नाही तिच्याकडे ते हट्ट करून मागताना.
खरच मी चुकलो ?

ती फक्त ती आहे म्हणून तिला विसरून तिच्याकडे तिच्यासारख बघताना,
आणि मी फक्त मी आहे म्हणून स्वतःला विसरून मुलासारख वागताना.
खरच मी चुकलो ?

माझ हरवलेले अस्तित्व तिच्यामधे शोधताना,
आणि भावनाशुन्य अमितच मन वेदनानी आक्रोशाने भरताना.
खरच मी चुकलो ?

तिच्यापासून दूर जाण्यासाठी आज थोड वेगळ वागताना,
आणि हे सर्व लिहून मनापासून तिची माफ़ी मागताना.
मी सांगतो,

खरच मी चुकलो....!"
तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि त्या नंतर मला या जगण्याचा..
कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,

कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,

आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ....

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,
तेंव्हा आपण आपलेच राहिलेलो नसतो,
डोक्यात फक्त तिचाच विचार फिरत असतो,
अन डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा दिसत असतो,

आपल्या वागण्यात अचानक बदल घडतो,
गचाळपणा जावून टापटीप पणा येतो ,
दिवस-रात्र फक्त तिचाच विचार सुरु होतो,
अन आपल्याच जगात आपण रममाण होतो,

चोवीस तास मोबाईल कानालाच असतो,
मिनिटा-मिनिटाचा वृतांत प्राप्त होत असतो,
बाकी मित्र-मंडळीचा मग हळू-हळू विसर पडतो,
अन आई-वडिलांसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो,

दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने,
काळ असाच पुढे सरकत असतो,
दोघांच्याही नात्यात दररोज,
नव-नवीन रंग भरत असतो,

हळू-हळू सुरु होतो मग रुसव्या-फुगव्यांचा लपंडाव,
कधी याच्यावर तर कधी तिच्यावर येत असतो डाव,
कारण दोघेही घेत असतात एकमेकांच्या हृदयाचा ठाव,
काहीच नाही झालं की शेवटी बोलतात, आता एवढाही खाऊ नकोस भाव,

अचानक एक दिवस अशी येते वेळ,
त्यावेळी सुरु होतो नियतीचा खेळ,
मग दोघांच्यातही रहात नाही कसलाच ताळ-मेळ,
अन अर्ध्यावर्तीच मोडून जातो त्यांच्या प्रेमाचा खेळ...