फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २ जुलै, २०१०

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस


तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बरंच काही निघून गेलयं तरीही मी उभाच आहे,
अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

तरीही बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती,
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी...

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही 

तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय......

काही चारोळ्या ....

"तुला माहिती आहे देवाने असे का केले की आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण हृदय मात्र एकच दिले ??............ कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे दुसरे हृदय शोधावे म्हणून. ♥ "


==================================================


"प्रेयसीला wedding ring पाहिजे होती, पण प्रियकर तिला teddy-bear देतो, त्या रागा मधे ती मुलगी तो teddy रस्त्यावर फेकून देते, प्रियकर तो teddy आणण्यासाठी रस्त्याआवर जातो पण मागून येनारि गाडी त्याला जोराने उडवते व तो जागच्या जागीच मरतो, त्याच्या अन्तविधिच्या वेळी, ती प्रेयसी तो teddy रडत रडत घट्ट आवळते, तेव्हा त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज येतो " प्रिये माझ्याशी लग्न करशील ? ही बघ wedding ring माझ्या (teddy-bear च्या) खिशात आहे "


==================================================


"तू माझ्यासाठी दारूच्या नशेसारखी आहेस, जेव्हा तू माझ्या बरोबर असतेस तेव्हा मी पूर्ण नशेत असतो, जेव्हा नसतेस तेव्हा मी बेचैन होतो, आणि जरी मला माहिती आहे की अखेरीस तू मला hurt करशील, मला दुख देशील, कदाचित ज्यामुळे माझा प्राण ही जाईल,................... पण तरीही मला तू पाहिजेस, कारण मी तुझ्या आधीन झालो आहे"


==================================================


"जर तुझे रक्त मला वाचवू शकते, तर मी तुझ्याकडे रक्ताचा एक थेंब मागेन,
जर तुझा आवाज मला वाचवू शकतो, तर मी तुझ्याकडे एक शब्द मागेन,
पण जर तुझे आश्रू मला वाचवू शकतात, तर मी तुला राडताना बघण्याएवजी मी स्वतहा मरणे पसंद करेन ♥ "==================================================


"तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला "==================================================


हातात हात घेशील जेव्हा
भीती तुला कशाचीच नसेल
अंधारातला काजवाही तेव्हा....
सूर्यापेक्षा प्रखर असेल==================================================


"प्रेम हे फुलपाखरासारखे असते ♥ , जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता, ते दुसरीकडे उडते, पण जेव्हा तुम्ही काही न करता स्तब्ध उभे रहाता, तेव्हा ते येते आणि तुम्हाला स्पर्श करते ♥ ....
म्हणून प्रेमाच्या मागे धावण्यापेक्षा वाट पाहुयात आपल्या आपल्या फुलपाखराची ...
नाही का ?'