फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

शब्द ओठातून....


कधी काळी मी पण असाच होतो
सर्वान सारखा …..
वाटायचं कोणीतरी असावी जीवाला जीव देणारी … .
ओठातून शब्द फुटले नाहीत की,
डोळे पाहून विचारणारी की.
काय झाल तुला आज ?
चंद्ररा सारख्या फुललेल्या चेहऱ्यावर
अमावस्याच्या रात्रीसारखा अंधार कसला आहे ?
दररोज हिरव्यागार गवतासारखा डोलणारा
माळावरच्या वाळलेल्या गवतासारखा का आहेस ?
महाराजांच्या पराकर्माच्या गोष्टी करणारा ….तू
कोणत्या पराजयामध्ये हरवला आहेस ?
बोल ना काही तरी......
ओठांनी नाही तरी डोळ्यांनी तरी …….

पण आता नको वाटत ग तुला पिढावसं …..
माझ्या पिढन्या नेच , कदाचित तू
नदी बनून सागराच्या जवळ येशील …….
पण नाही कळणार त्या गोड पाण्याची चव ……
कदाचित असं हि होईल
किनारा बनून वाट पाहत राहीन ......
पण लाटेला ते जाणवणार नाही …..
पुन्हा ती सागराकडेच ओढली जाईल ….
कदाचित संस्कृतीची असेल जाण
प्रेमळ आई बाबांची असेल ओढ
म्हणून नाही फुटणार शब्द ओठातून....
न तुझ्या न माझ्या.......

सांगा कसे जगायचे ?


बुरसटलेल्या विचारात
बुडालेल्या समाजात
हरवलेल्या माणुसकीत
सांगा कसे जगायचे ?

गळक्या झोपडीत
फाटक्या कपड्यात
लपवलेल्या अब्रुत
सांगा कसे जगायचे ?

आभाळभर दुःखात
चिमुटभर सुखात
मानलेल्या समाधानात
सांगा कसे जगायचे ?

दुरावलेल्या नात्यात
अनोळखी चेहऱ्यात
खोट्या मुखवट्यात
सांगा कसे जगायचे ?

मोडलेल्या विश्वासात
कोमेजेल्या स्वप्नात
रुतलेल्या चिखलात
सांगा कसे जगायचे ?

का सुचत नाही काही

का सुचत नाही काही
काय करावे ना कळेना
का अवस्था आज मनीची
काय व्यथा ना समजेना

का लिहिण्या येथ बसलो
काय शब्द तो आठवेना
का खरडतो लेखणी उगीच
काय अक्षर ना उमटेना

का ऐकतो एकटवून जीव
काय सूर तो सापडेना
का धरावा ताल येथे
काय स्वर ना फुटेना

का घुटमळतो आणि फिरतो
काय भिंतीत मन रमेना
का विणतो पाश मोहाचे
काय गुंतलो ना सोडवेना

का निघालो एकटाच उगीच
काय सोडले मागे स्मरेना
का उरलो रिता इथे
काय कमावले ना मोजवेना

का दमलो आणि थांबलो
काय अंतर कमी होईना
का चालायचे निरर्थक असेच
काय वाट ना संपेना

का संपल्या इच्छा मनातल्या
काय विरक्ती हि सोसवेना
का न राहिले हेतू जगण्याचे
काय जोडली नाळ तुटेना

नसता जवळी मी

नसता जवळी मी
ती वाट बघत रुसावी
क्षणात बघता मज
प्रेमरूपी फूगावी

बघता पुष्प मज जवळ
चेहऱ्यावर चमक दिसावी
लट थोडी बाजूला सारून
माफी तिला मागावी ..

तिचे लाड पुरवत
जवळ तिला करावी 
कवेत माझ्या शिरून
ती गालातल्या गालात हसावी

स्तब्द श्वासांपरी
शब्दांना मोकळी करावी
आत खोल डोळ्यांमधून
हृदया पर्यंत पोहोचावी

हातात माझा हात घेवून
ती मनसोक्त फिरावी
धुक्यांमधील रम्य सृष्टी
तिच्या गालांवर दवरूपी दिसावी

दोघांमधील प्रेमगीत 
चांदण्यांनी ऐकावी
चंद्राने झाडांमागून बघितले
कि ती पापण्या मिचकावून लाजावी

न्याहाळीत तिला असेच
प्रभात होवून जावी ..
तिच्या सोनेरी रूपाने 
दुनिया उजळून निघावी