फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

किती छान असतं ना ? आपण कुणालातरी आवडणं...

किती छान असतं ना ?

आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू
मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपल्या फोनची
तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी
त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

रीती रिवाज

आजुनही का
न मज कळले
हे नियम कुणी
न कुठून आले

परंपरा न रीती
जुन्या रिवाजात
जगाशी नाते हे
जूळले का तुटले


===================================


जगाच्या रिती
लोकांची नाती
शोधता उत्तर
होते भटकंती

नियम वाढले
नियम बदलले
नवे करायला
जुने तोडले



====================================


मनात बिंबला होता एक पण
पहायला आले भलतेच अनेक
माझं मन आवड नाही विचारले
नशिबाचे खेळ उलटे का फिरले .........कळले नाही!!

रितीने घेतला हूंडा तर मजबूत
नांदवले आजवर उपकार समजुन
गो-या रंगावरचं पापुद्री प्रेम त्याच
जगण्या मरण्यातही आसतो फरक ..... कळला नाही !! 

सोमवार, २७ सप्टेंबर, २०१०

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

तु कदाचीत रडशीलही

हात तुझे जुळवुन ठेव तु

सगळी आसवं तुझी त्यात सामावतील

जो थांबला तुझ्या हातावर

नीट बघ त्याच्याकडे

एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!



माझ्या आठवणी एखदयाला

सांगताना तु कदाचीत हसशीलही

जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता

नीट वापर त्याला

अडखळलेला तो शब्द मीच असेल..!



कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला

त्याच्या तेजाला तु निखरत राहशील

मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं

नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!



कधी जर सुटला बेधुंद गार वारा

मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील

मध्येच स्पर्शली तुला

जर उबदार प्रेमळ झुळुक

नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०१०

आज पुन्हा सूर्य शांत आहे........
आज पुन्हा वारा मंद आहे...........
ती नसतानाही तिच्यावर लिहिण........
हा माझा छंद आहे..........

***************************


शब्दांचीच झालीये गफलत
मनाला जबाबदार धरू नकोस......
चुकलंय काय ते सांग
असा अबोला धरू नकोस.......

आजकाल मला स्वप्नच पडत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी हसत नाही
उगाच हुंदक्यांच्या आवाजाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी बोलत नाही
उगाच ओळखीच्या हाकेने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी चिडवत नाही
उगाच कसल्यातरी भासाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी जवळ येत नाही
उगाच मी दचकल्याने मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू वळून पाहत नाही
उगाच तुला थांबवताना मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही

आजकाल मला स्वप्नच पडत नाही .........

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

आठवणीं

इथला प्रत्येकजण हा,
कोणासाठी तरी थांबत असतो!
येणारा मात्र नेहमी,
आठवणींसारखा लांबत असतो !

म्हणून आठवणींच्या विश्वात,
तिला न्यायला मी घाबरतो !
जाताना जरी असलो सोबत,
तरी यायला मात्र विसरतो !

आठवणींच्या त्या विश्वात,
फक्त आम्ही दोघेच असतो !
दोघांच्याच आठवणीत,
आम्ही आमच विश्व सामावतो ! 

आता मात्र आठवणींची,
मलाच भिती वाटते !
कारण आगीमध्ये मेण,
विरघळून जात असते !

तुझ्या वाटेवरचे डोळे,
आता काही केल्या हटत नाही !
रडून रडून थकले डोळे,
आता पाणीही काही आटत नाही!

सोमवार, २० सप्टेंबर, २०१०

तू भेटलीस..अन्


तू भेटलीस..अन्
आयुष्यच बदलल..!

तशी तुझी अन् माझी
भेट पहिलीच..
तरीही तुझ्या डोळ्यात..
जनमानची ओळख पटली..
दोन अनोलख्या जीवांची
कशी अगदी सहज..
जोडी जुलली..!

प्रेम.. नुसता एक शब्द..!
स्व्प्न.. नुसत एक खूळ..!
पण..
तू भेटलीस..
मग कलल..
प्रेम काय असत..!
स्वप्न पाहन काय असत..!
कुणालातरी..
कुशीत घेन.. काय असत..!

खरच..
तू भेटलीस.. अन्
तुझ्या श्वासासोबत..
माझ आयुष्य जगू लागलो..!
स्वप्नाच्या पालीकडेल्या जगात..
तुझ्या सोबत हरवू लागलो..!

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०१०

किती प्रेम करतो तुझ्यावरती कसे सांगू तुला ?

किती प्रेम करतो तुझ्यावरती कसे सांगू तुला ?

आजही तुझ्या परतण्याची का वाट पाहतो कळत नाही मला....

जेथे जावे तेथे तूच दिसते,
असा एक क्षणही नाही ज्यात तुझी आठवन नसते...

तुझ्यामुलेच तर प्रेमाची व्याख्या समजली मला,
सांग न कसे विसरून जाऊ तुला?

प्रेमाचा तो पहिला पाउस आजही आठवतो मला,
तुझे ते हसण आजही अनुभवतो क्षणा-क्षणा...

डोळे बंद करताच तुझ्या सर्व अदा येतात समोर ,
चेहर्यावर स्मित हास्य येते माझ्या त्या क्षणा....

हरवतो मी कुठे समजतच नाही,
खरच तुझ्याशिवाय मला दुसरे कही सुचतच नाही..

आजही तुझीच वाट पाहतो आहे,
कधी येशील तू याचा विचार करतो आहे,
तुझ्या आठवणीत आयुष्य मला घालायचे आहे,
कारण तू येणार नाही हे मला ठाव आहे.....

आजही जेव्हा तू समोर येतीस,
तेव्हा-तेव्हा माझे वेड मन विचारते मला,
हिच्या चेहर्यावरून तर वाटते काही वेगलेच मला,
मग तू शब्दांचा का माझ्यासोबत असा खेळ केला ?

काय भावना आहेत या मनात कशा सांगू तुला,
"प्रेम म्हणजे प्रेम असते" हे कसे पटवू तुला ?
किती प्रेम करतो तुझ्यावरती कसे सांगू तुला ?

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

जाते आहेस निघून नक्की नक्की जा


जाते आहेस निघून
नक्की नक्की जा
पण एकदा तरी माघे
वलून पहा

जाणारी पाय वाट
नक्की तुला रुतेल
तीच उत्तर तिला देऊन जा ......

मधेच लागणार झाड़
ओढनी तुझी ओढेल
हळूच त्याला झटकून जा
त्याच उत्तर त्याला देऊन जा

मनामधे तुझ्या
खुप विचार येतील
डोळ्यातून माझ्या खुप अश्रु येतील
त्याच उत्तर त्यांना देऊन जा

जातेस आहेस निघून नक्की नक्की जा
पण एकदा तरी माघे वलून पहा

बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

तुझ्यासाठी.

आईला खोट सांगुन यायचो...
फक्त .... तुझ्यासाठी.......
खुप बहाने बनवायचो......
तुला भेटण्यासाठी
क्लास ला दांडी मारायचो....
तुला पाहण्या साठी
रात्रभर जागा असायचो.........
तुझे एस एम एस वाचन्या साठी
खुप वेळा घरी मार खालला.......
तुझ्या प्रेमासाठी
नेहमी मोबाइल कड़े लक्ष जात ..........
तुझा मिस कॉल पाहन्यासाठी
मागे वलून वलून पाहतो......
तुला इशारा करण्यासाठी
पाउस आल्यावर रडून घेते .......
अश्रु लपवन्यासाठी
मला सोडून नको जाऊ .......
सगळ्यांशी नाती तोडली फ़क्त तुला मिळवण्यासाठी साठी
रडून रडून मरून जाइल .......
फ़क्त तुझ्या प्रेमासाठी
तू कस ही ठेव ......
मी जेगेंन आणि मरेन फ़क्त तुझ्यासाठी
पण तू सोबत नसशिल तर
सांग तरी मी जगु कोणासाठी........?

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०१०

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०१०

आठवण माझी कधीतरी येईलच तुला


आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

मन असच वेड असत
नको त्याच्यावर प्रेम करत
प्रेमभंग झाला की
उगीच रडत बसत

मन असच वेड असत
म्रुगजळामागे धावत अन
तुझ्या नसलेपणातही
तुझ असलेपण असत

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

बर झाल तू गेलीस सोडून मला ते


बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर
भीती ताई ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची
आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची
आता करतो मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge
आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता असतो मित्रांसोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , करतो एन्जोय चायनीज पार्ट्या
आता कोणीही म्हणत नाही " आज कसा काय साहेबाना वेळ म्हणाला "
आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला
आणि नाही वाटत भीती कुणी आपल्या कड़े पहायची
आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

आता दुरावलेले cricket आहे माज्या सोबतीला
आता रमतय माझ मन अभ्यासात , वाटतय त्यात काहीतरी तथ्य
करतोय मी माज्या career चा विचार
आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी
स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतोय त्या घरात तिची ,
येइल ती , एका दिवशी , माज्या बरोबर लग्नाचे ७ फेरे घेवून बनवेल माझे आयुष्य सुखाचे

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार

जाता जाता प्रेमाचा कठू अनुभव देवून गेलीस,
२१ व्या शतकातील आधुनिक मुलींच्या स्वभावाची ओळख करून दिलीस
आता आहे माझ्याकडे अनुभवाचे गाठोडे , मग कसा फसेन त्या जाळ्यात पुन्हा ?
आता घेणार सात फेरे ते फक्त माझ्या आई च्या समत्तिने ,
१ डाव फसला आहे म्हणुन आता दूसरा आई च्या हातात दिला आहे
नक्कीच तो सफल होयेल, आणि नक्कीच त्याला समर्थांचा आशीर्वाद असेल यात शंका नाही

बर झाल तू गेलीस सोडून मला ते
आता नाही करत मी तुजा विचार
असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करतोय ................... !!!
थोड्या वेळापुरता का होईना स्वताशीच खोट बोलतोय ................... !!!
आणि एकटाच स्वताशी हसतोय ................... !!!
तरीही मनापासून १ खर सांगतोय ................... !!!


" बर झाल तू गेलीस सोडून मला ते ,
आता डोक्याला कसलंच tension नाही आहे "

खरोखरच मी कविता लिहिली का ?

कविता करण्याचा विचार मानत कधीच नव्हता
आणि कधी केलीही नव्हती
प्रेम करण्याचा विचार ही मनात कधीच नव्हता
आणि ह्या पूर्वी कधी केलही नव्हत
तरीही तिच्या सोज्वळ स्वभावाला भुलून मी तिच्या प्रेमात पडलो
तेव्हा अनुभावल की 'प्रेम करायच नसत ते आपोआप होत'
पण मी आयुष्यभराचा विचार करताना तिला आठवडा च पुरेसा वाटला
जाता जाता माझ्या मनात ती दुःखाचे डोंगर उभारून गेली
कुणाच्या माथि मारायचे हे डोंगर , कोणाला सांगायचे हे दुःख ,
हा विचार मनात असताना समोर १ कागद दिसला
आणि मनातल दुःख कागदावर शब्द म्हणून उमटल
मनाचा भार हलका झाला
आज जेव्हा हा कागद तुम्ही वाचलात आणि जी प्रशंशा केलात
तेव्हा मला ह्याची जाणीव जाली की ती माझ्या मनातील भावना १ कविता जाली आहे !!!
धन्यवाद !!!

तुझ्याचसाठी .........

देवा एकाच मागणी
तिची पापणी भरू दे
माझ्या नावाचा एक तरी थेंब
तिच्या नयनी तरु दे..
-
रात अशी ही तंद्रित
पापणिहि बघ लवते आहे
ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे
कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे
-
तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..
-
एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल
-
तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||
-
तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय
-
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
-
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
-
आज सारे विसरली तू
नावही  येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......
-
तेव्हा सागर किनारी साक्षीने
तू घेतल्यास किती शपथा.....
किती मारल्यास मिठया तू
तो चंद्र ढगात लपता........
-
नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.
-
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले......
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले......
-
डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.
-
आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाहीकधी रडु लागलो...
-
तुझ्या नि माझ्या वाटा,
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खर तर,
पण मिटत नाही अंतर
-
मनातला प्रत्येक क्षण
ओठांवरती येईल का?
ओठांवरील प्रत्येक शब्द
मनातच राहील का?