फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

तुमच काय, माझ काय..........

प्रेमात पडल की असच होणार....!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तोच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तिचीच आठवण येणार

तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

डोळ्यात तिच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चान्दणे साण्डणार
दुसरीचा चेहरा सुद्धा मग;
तिच्यापुढे फ़ीका वाटणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट बघणार,
मित्त्रांसमोर मात्र बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तिचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तिच्या inbox आपला भरुन जाणार्,
तिचा साधा message सुध्दा आपण जतन करुन ठेवणार्,
प्रत्येक message पहिला तिलाच forward होणार,
तुमच काय, माझ काय...........
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०१०

येशील ना तेव्हा तुही......... राख माझी वेचण्यासाठी

ये......पुन्हा एकदा
माझ्या कवितांना विषय देण्यासाठी
ये......पुन्हा एकदा
माझ्या जगण्याला आशय देण्यासाठी

मिलनाची स्वप्नं बघतो मी
तुजविन तुकड्यांत जगतो मी
ये...मला एकसंध करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बेधुंद करण्यासाठी

उत्तरे न ज्यांची मजकडे
मन प्रश्न असे विचारू लागले
भावना घुसमटून गेल्या
शब्द आत गुदमरू लागले
ये...मला आझाद करण्यासाठी
प्रेमात पुन्हा बरबाद करण्यासाठी

कविता माझ्या रडू लागल्या
भावनांना मरण आलं
आगीत तुझ्या विरहाच्या
सारं काही जळून खाक झालं

जमतील सारे जेव्हा
चिता माझी रचण्यासाठी
येशील ना तेव्हा तुही
राख माझी वेचण्यासाठी

राख माझी वेचताना
जर तुला का रडू आलं
तर दोन थेंब तुझ्या अश्रूंचे
माझ्या राखेवरती गळू देत
मरण माझं वाया गेलं नाही
हे मलासुद्धा कळू देत

शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०१०

प्रेमात पडलं की सारेच जण कविता करायला लागतात

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
 
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
 
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण .............!!!!!!!!!
आयुष्याच्या प्रत्येक  वळणावर सोबतकुणाची तरी हवी असते 
पण असे का घडते कि जेव्हा ती
व्यक्ती हवी असते तेव्हाच ती  आपल्या जवळ नसते ?

असे म्हणतात कि प्रेम शोधून सापडत नसते
प्रेम हे नकळत होऊन जाते
मग तरी देखील प्रत्येक  व्यक्ती
प्रेमाच्या शोधात का असते ?

असे म्हणतात कि प्रेमात पडल्यावर
सर्व काही सुंदर असते
तरीदेखील प्रेमात पडल्यावर
अश्रूंना का स्थान असते

हे सर्व काही असले तरी
प्रेम हे अतिशय सुंदर असते
पण काही जणांना ते
शोधून हि सापडत नसते

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०१०

सांग ना तू परत येशील का ???


तुझ्या आठवणीत अडकलेले क्षण काही
पुन्हा नव्याने डोळ्यासमोर आले
पण तू मात्र अजून तिथेच का ???.........

सांग ना तू हि परत येशील का ???


माझ्या डोळ्यांत पाहताना तू थोडीशी घाबरली होतीस
सर्वांची नजर चुकवून तू हळूच मला पाहत होतीस,
पण भेटशील जेव्हा पुन्हा सखे..
परत तीच झलक दाखवशील का ???....
सांग ना परत येशील का ??? 

तुझ्याशी बोलताना मनात चाललेले विचारांचे काहूर
फक्त तुझ्या स्मित हसण्याने गेले सगळे विचारायचे राहून
आता तरी त्यांची उत्तरे मिळतील का???....
सांग ना परत येशील का ??? 

आजही तुझ्या आठवणींचा गंध मनात दरवळतो आहे
जणू काही तो मला तुझ्या येण्याची चाहूल देतो आहे
प्रेमात तुझ्या चिंब होवून नाचावे
अखेरचे हे स्वप्न माझे आता पूर्ण करशील का??? ... 
सांग ना परत येशील का???

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

तो क्षण निघून गेलामी पाहतच राहीलो

तो क्षण निघून गेलामी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असतआज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०१०

एकदा तरी प्रेम करून बघ…



एकदा तरी प्रेम करून बघ…
सगळ काही पाहिल असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ..
एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..
खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..
कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..
खुप छान वाटत रे..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ…
नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..
नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..
एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..
नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..
विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..
रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..
रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..
सोपं नसत रे…एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..
सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ…………

आई

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.

अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.
कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.


तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.

माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

तू फक्त एकदाच ये.....!!


संपले सारे संयम,
तू फक्त एकदाच ये.....
उरले श्वास थोडे,
तू एकदाच जवळ घे.....

विवशताच हताश झाली,
तू फक्त एकदाच ये.....
आसवांची बरसात थकली,
तू एकदाच जवळ घे.....

प्राणांची ज्योत शमली,
तू फक्त एकदाच ये.....
सरणाची रास रचली,
तू एकदाच जवळ घे.....

स्वप्नांचे निखारे निमाले,
तू फक्त एकदाच ये.....
राख वा-यावर उडाली,
तू एकदाच जवळ घे.....!!
भाव माझ्या मनीचे,
जाणिले ना कुणी!
अश्रू दाटले डोळ्यात
पाहिले ना कुणी!

मुकेच राहिले शब्द,
ऐकले ना कुणी!
दुःख माझ्या हृदयाचे,
वाचले ना कुणी!

शब्द सुरेख कवितेचे,
गुंफले ना कुणी!
गीत मधुर ओठीचे,
गायले ना कुणी!

एकटाच चालत होतो,
साथ दिली ना कुणी!
भरकटलो होतो जरी,
मार्ग दावला ना कुणी!

नाही दुःख मनी,
नाही सुख मनी!
व्यथा माझ्या मनीच्या,
जाणिल्या ना कुणी!

~खर प्रेम~

आज तिने दिलेल्या वेदनेचे अश्रु,
माझ्या डोळ्यातून गळतायेत .......
आज माझ्या प्रेमाचे स्वर 
कुणा दुसर्याच्याच ओठात घुमतायेत......

आज माझ्या प्रेमफुलांचा सुगंध,
कुणा दुसर्याच्याच श्वासात दरवळतोय.....
मी मात्र वेदनेच्याच,
काट्यांमध्ये गुरफटतोय .......

आज तिने तिच्या मनातल,
माझ नाव पार पुसून टाकल आहे.....
मी मात्र तिच्या प्रेमाला जागा अपुरी पडू नये,
म्हणून माझ काळीजच कापून टाकल आहे.....

हाच फरक असेल कदाचित,
तिच्या प्रेमात अन माझ्या प्रेमात...

म्हणूनच
ती प्रेमात असूनही,
तिला खर प्रेम मिळाल नाही,
अन वेदनेत असूनही
माझ प्रेम कधी हिरावल नाही.....

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

पुन्हा प्रेम करणार नाही.


पुन्हा प्रेम करणार नाही.....
भेट आपली शेवट्ची असुन
निरोप घेत आहे…
वरुन शांत असले तरी
ह्र्दयात रडत आहे…
जात आहे सोडुन मला
नाही अडवणार मी तुला…
असशील तिथे सुखात रहा
याच शुभेच्छा तुला…
निरोप तुला देताना
अश्रु माझे वाहतील….
काऴजाच्या तुकड्याना 
सोबत वाहुन नेतील…
त्या वाहणारय़ा अश्रुतही 
प्रतिबिंब तुझेच असेल…
निट निरखुन पहा त्याला
प्राण मात्र त्यात दिसेल…
वाट आपली दुभंगली आता
परत भेटणे नाही…
प्रवास जरी एक आपला
मार्ग एक होणे नाही…
आठवण तु ठॆवु नकोस
मी कधीच विसरणार नाही…
भेटणे तुझे अशक्य तरी 
वाट पाहणे सोड्णार नाही…
जातेस पण जाताना एवदे सांगुण जाशील का?
भेट्लो जर कधी आपण …
ओळख तरी देशील का?
जाता जाता थोडे तरी…
मागे वळुण पाहाशील का?
प्रत्यशात नाही तरी…
डॊळ्य़ानी बोलशील का?
बोलली नाही तु जरी…
नजर तुझी बोलेल का?
गोधंळलेल्या अत:करणाची… 
खबर मला सांगेल का?
कुठॆतरी ह्र्दयात इतिहास सारा आठवशील 
तो आठवण्यापुरता तरी तु…
नक्कीच माझी राहशील 
नजरेने जरी ओळखलेस तु… 
शब्दानीं मी बोलणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात…
नसती वादळ असणार नाही
नेहमीच पराभव झाला तरी….
हक्क तुझ्यावर सांगणार नाही
पण तुझी शपथ पुन्हा प्रेम करणार नाही….