भाव माझ्या मनीचे,
जाणिले ना कुणी!
अश्रू दाटले डोळ्यात
पाहिले ना कुणी!
मुकेच राहिले शब्द,
ऐकले ना कुणी!
दुःख माझ्या हृदयाचे,
वाचले ना कुणी!
शब्द सुरेख कवितेचे,
गुंफले ना कुणी!
गीत मधुर ओठीचे,
गायले ना कुणी!
एकटाच चालत होतो,
साथ दिली ना कुणी!
भरकटलो होतो जरी,
मार्ग दावला ना कुणी!
नाही दुःख मनी,
नाही सुख मनी!
व्यथा माझ्या मनीच्या,
जाणिल्या ना कुणी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा