फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, २४ मे, २०१०

काल तुझी खूप आठवण येत होती
अश्रुना मोकळी वाट करून देत होती
खूप सार मनातल सांगायचं होत
तुझ्या पदरात दडून रडायचं होत

तस्वीर पाहताना डोळे पाणावली होती
मला समजून घेणारी फक्त तूच तर होती
दु:खाच आभाळ मनात दाटलं होत
मोकळ करायचं सार पण तू दूर होतीस

दूर राहूनही रोज विचारपूस करायचीस
काहीच नात नसतानाही माझ्यासाठी रडायचीस
मन माझ फक्त तुलाच तर ठाऊक होत
माझ्यासाठी रडणार तूच १ पाखरू होत

वेड माझ मन खूप हळव आहे
समजून फक्त तूच तर घेतलं आहे
तुला एकदा भेटायची खूप इच्छा आहे
कारण माझ्यासाठी रडणारी "मैत्रीण" मिळाली आहे
माझ्यासाठी रडणारी "मैत्रीण" मिळाली आहे...
एक अति श्रीमंत पिता आपल्या मुलाला एका खेड्यात घेऊन गेला।लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.

' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.

आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.

आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.

राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.

आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्‍यांची सेवा करतात.

आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.

संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.

वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.

पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.