फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

मी अजुनही अनुभवतो तिला..

"मी अजुनही अनुभवतो तिला....

प्रत्येक लयबद्ध गाण्यामधे,
आणि,
जाणवतो मला तिचा निखळपणा ओल्याचिंब पावसाच्या पाण्यामधे.

मी अजुनही अनुभवतो तिला....

गुलाबाच्या पाकळीच्या स्पर्शामधे,
कित्येकदा पाहिलय तिला अंधारात उभ त्या निष्ठुर निशब्द आरश्यामधे.

मी अजुनही अनुभवतो तिला....

मोगऱ्याच्या गर्द सुवासामधे,
आजही
मखमली मिठीत सापडतो तिच्या प्रत्येक बेधुंद श्वासामधे.

मी अजुनही अनुभवतो तिला....

शब्दासारख माझ्या आठवणीच्या प्रत्येक पानावर.
हे असच
तिला बोलावून घेतो जेव्हा दडपण येत वेड्या अक्षयच्या मनावर...."