दोन्ही पण खुप वेगळे आहेत.
तू नाही पण तुझी आठवण ,
माझ्यासोबत प्रत्येक क्षणी असते.
माझ्या एकटेपणाला तू हवी असतेस,
पण तुझी आठवणच माझ्या सोबत असते.
काही वेळा तर तुझ्या सोबत खुप बोलावेसे वाटते,
पण माझ्या मनात दडलेला तुझा आवाज ऐकून मन हलके होते,
पुन्हा एकदा तुझ्यापेक्षा, तुझी आठवण माझी साथ देते.
आणि माझ्या एकटेपणाचा श्वास होते.
पण तुझ्या आठ्वानिसोबत नाही ग,
तुझ्यासोबत मला जगायचं....
तू आणि तुझी आठवण खुप वेगले आहेत.