फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, १२ जानेवारी, २०११

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूच
सुख देता देता दुःखच फक्त दिलेस तू
अश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतो
तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझ्या भाषाच निराळी होती
पण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होती
मनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतो
आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

सांग, तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का?