फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

श्वासात श्वास गुंतत गेला आणि भावना झिंगत गेल्या
तुझ्या माझ्या प्रेमाच्या रासलीला रंगत गेल्या


तेव्हा फक्त स्पर्शाची भाषा आणि नजरेची बोली होती
माझ्या मनात सजलेली तुझ्या  स्वप्नांची खोली होती
हळूहळू जगाचा विसर पडला सगळ काही माग सोडलं
पण दोघांच्या नात्यात त्याने विघ्न आणलं
आपल्यात येऊन तो कधी उभा
ठाकला मी ही नाही जाणल.......


त्याच्यासाठी तुही माझा हात सोडलास,
कण-कण प्रेमाचा जोडून बांधलेला,
भावनांचा गाव मोडलास....

असा तो तिसरा नेहमीच दोन मनांच्या मध्ये येतो 
आणि क्षणार्धात स्वप्नांचा संसार चूर करून जातो ..

पण तुला तेव्हा कळाले नाही...
कोण आपला आणि कोण परका...

तरीही तू माझा विचार न करताच निर्णय घेतलास... 
आणि आपल्या प्रेमाचा शेवट केलास.......

आसवे

सांग ना, कोठून येती आसवे !
पापण्यांना भार झाली आसवे

हास तू, कोणीतरी हे बोलता
मुक्त वाहू लागली ही आसवे

त्रास होता बंद डोळे उघडती ,
वाहुनी घावास नेती आसवे

शुष्क या डोळ्यांवरी जाऊ नका
वाहती त्यातून माझी आसवे

ओठ दमले गप्प झाले शेवटी
नेमकी कामास आली आसवे

ठेवता विश्वास हो कोणावरी ?
आपली नसतात काही आसवे