फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १२ जुलै, २०१०

माझ्या चार ओळी

तुझी आठवण आली तर मन रमत नाही,
फोटो असूनही मग तुला पाहिल्याशिवाय राहवत नाही....


खरचं नशीब लागत
कुणाच्या ह्रुदयात रहाण्यासाठी
आसवांनाही किमंत मोजावी
लागते वाहण्यासाठी


भरुन येतात डोळे
पण मी वाहु देत नाही
याचा अर्थ असा नाही
कि तुझी आठवण येत नाही



त्या वाटेवर चालतांना
आजही तु मला दिसते
तु जातेस का तीथे कधी
जेंव्हा माझी आठवण तुला होते



काही गोष्टींचा विसर
तुला नक्की पडला असेल
बघं हल्ली तुला
शांत झोप येत नसेल



सर्व काही समजुन
नसमजण्यासारखं करतेस
ओठांनी न बोलता
डोळ्यांनी वार करतेस



माझं प्रेम कधी
तुला कळनार नाही
पण विसर माझा कधी
तुला पडनार नाही 

आठवतय,


आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,
आपण केलिली प्रेमाची साठवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...

आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,
ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझे आयुष्यच झाले आहे अता निर्जन...

आठवतय, मला जोराची भूक लागली असताना...
तू अगदी प्रेमाने भरवले होतेस मला जेवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
मी अता काहीही करत नाही कसले सेवन...

आठवतय, आपण दोखे खरेदी करत असताना,
आपले एकमेकांवर असलेले प्रेमच होते खरे धन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझ्याच नावाने साजरे करतो मी प्रत्येक सण...

आठवतय, मी माझ्या दुखात रडत असताना,
तू उघडलेस माझ्यासाथी आपल्या प्रेमाचे आलिंगन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
सुखात सुद्धा मी करत आहे स्वतःशीच भांडण...

आठवतय, आपण कुठे ही भेटत असताना...
फ़क्त प्रेमाचच बोलायचो आपण काही पण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझ ते बोलन संपल नाही आहे अजून पण...

आठवतय, आपले प्रेम कठिन परिस्थिति असताना,
दोखानी मिळून घेतले होते अमर प्रेमाचे प्रण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
हताश होऊंन घेतले मी एका कोपरयाचे शरण...

आठवतय, आपण दोखे एकमेकाना भेटत असताना,
फ़क्त आपले प्रेम आणि दोखे आपण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
शत्रु वाटतात मला अता प्रत्तेक जन...

आठवतय, आपण दोखे लांब एकमेकांपासून असताना...
जगन कठिन झाले होते हे प्रेमाचे जीवन..
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझी आठवणच झाले आहे माझे सहजीवन...