फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

सोडले मी


मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |

ती आहे,,,,,,, पण ती दूर आहे


तिचा विचार करून
रात्र रात्र जागता येतं
ती आत्ता हवी म्हणून
वेड्यासारखं वागता येतं
हिरमुसुन मन कधी
खूपच खट्टू होतं
ती जवळ नसल्याचं शल्य
बिकट घट्ट होतं
नुसता स्वतःशीच संवाद
आता नको आहे
ती आहे
पण ती दूर आहे

तुझी खूप आठवण येते
फोनवर सांगता येतं
तसे सांगितले तर तिचही
मन लगेच हळवं होतं
ती फोनवरच म्हणते
कधी भेटशील रे?
श्वास दीर्घ होतो दोघांचा
वाहू लागते उष्ण वारे
किती वेळ बोलता येणार
शेवटी फोन ठेवावा लागतो
मोठ्ठा दगड हृदयावर
रोज रोज घ्यावा लागतो
बोलायचे राहून गेलेले
किती अव्यक्त आहे
ती आहे
पण ती दूर आहे

बुडतो आहे मी!!!

पाणावलेले डोळे 
ओलावलेल्या पापण्या 
कशा व्यक्त करू मी...
...दाटलेल्या भावना? 

भावनांचा पूर 
दाटून आलेला उर 
मन...सैरभैर...
जसं आत्म्याशीच वैर! 

वाहत होतीस तू 
वाहत आहे मी !!
तीरावर थांबलेली तू 
बुडतो आहे मी!!!

प्रेम म्हणजे.....

प्रेम म्हणजे निरभ्र आकाश,
निर्मल, निरपेक्ष भावनेने व्यापलेले....
एक भला चंद्रमा, 
त्याच्या प्रकाशाने चांदण पडलेल....!!

प्रेम म्हणजे अथांग समुद्र, 
डोळ्यांचीही मजल ना पोचलेला....
नावेवरचा एकच नावाडया, 
अंतरी दूर पोहचलेला....!!

प्रेम म्हणजे निसर्ग, 
हिरवा शालू पांघरलेला....
धरतीच्या मिलनासाठी, 
वरुणराजा बरसलेला....!!

मरणाला मरणाची भिती वाटावी

मरणाला मरणाची भिती वाटावी
मरणवाट ती मला भेटावी......

काळजात काळजाची स्पंदन घोटावी
आयुष्याची सरती वर्ष हळूवर लोटावी 

कळुन ती न कळावी
रीत अशी ऊरी बाळगावी 

नेहमी वाट नवी शोधावी 
हुरहुर ती नवी अनुभवावी 

पुरुन ऊरनार ती आठवण जपावी 
दुःखातही जी भरभरुन हसावी