का आम्ही रोज रोज मरावं
का कुणासाठी रात्र-रात्र जागावं
का आम्ही वेड्यासारखं वागावं
अन जिच्यासाठी हे करावं
तिने मात्र मी तुझ्याबद्दल कधी
असा विचारच केला नव्हता...
असं म्हणून आमच्या जिवाला
तिच्या मनाच्या 'वेशीवर' टांगावं...
त्यापेक्षा कधी कधी असं वाटतं
आपण आपलं एकट्यानं जगावं...
का कुणासाठी आम्ही 'देवदास' बनावं का कुणाच्या आठवणीने रोज झुरावं.
का मिञ-मंडळींना तोडावं
का जुन्या नात्यांवर पाणी सोडावं
अन जिच्यासाठी हे करावं
तिला याबद्दल काहीच न वाटावं...
त्यापेक्षा कधी कधी असं वाटतं
आपण आपलं एकट्यानं जगावं...
का कुणासाठी आम्ही स्वप्नं बघावी
का कुणा स्वप्नपरीची जागा द्यावी
अन जिची आम्ही स्वप्नं बघावी
तिनेच त्या स्वप्नांना स्वहस्ते ' काडी ' लावावी...
का कुणासाठी आम्ही कविता करावी
प्रत्येक भावना शब्दांत पेरावी
अन जिच्यासाठी कविता करावी
तिने ती न वाचताच फाडावी...
आम्हालाही वाटतं कुणी आपलंसं असावं
आमच्या सुख-दुखांना तिने आपलंसं म्हणावं
आमच्या जखमेवर फुंकर घालावी
अन जिच्याकडून आम्ही ही अपेक्षा ठेवावी
तिनेच आमच्या जखमेवर 'मीठ' चोळावं...
त्यापेक्षा कधी कधी असं वाटतं
आपण आपलं एकट्यानं जगावं...
का कुणाला आम्ही आयुष्य मानावं
का कुणाला सर्वस्व द्यावं
अन जिच्यासाठी आम्ही आयुष्यातून उठावं
तिने मात्र तिच्या आयुष्यातून आम्हाला
किड्यामुंग्याप्रमाणे अगदी अलगद झटकावं...
त्यापेक्षा कधी कधी असं वाटतं
आपण आपलं एकट्यानं जगावं...
पण हे कधी शक्यच नसत कि आपण एकट्याने जगावं....
कारण तिच्या आठवणी सतत सतावतात,
डोळ्यांतून रोज रोज अश्रू घालवतात...
मी तिची आजूनही वेड्यासारखी वाट बघत आहे, हे तिला कोणी सांगाव ?