फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, २४ मार्च, २०११

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,
तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.
तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,
माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,
अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,
रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,
माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,
मग का वळवावे मत तिने तिचे,
हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,
हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,
द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,
पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,
तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),
समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,
ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,
खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,
तिथून तिची सुरुवात व्हायची.
ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,
सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,
हा वास्तव मला मान्य होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

बुधवार, १६ मार्च, २०११


हवेच्या झुळ्केसारखी जीवनात माझ्या आलीस 
मला न कळतंच मला सोडूनही गेलीस 

रडत असताना तूच माझे अश्रू पुसलेस,
हास्य जेव्हा आले ओठावर तूच मला रडवलेस,

तुटलेला असताना तूच मला सावरलेस....
तुज्यावर विश्वास ठेवला आणि तूच मन माझे तोडलेस...

तू चांगली बनून माझ्या मदतीला आलीस....
मला न कळताच मला मोडूनही गेलीस,

भावनाशुन्य असताना मनाला स्पर्श केलास,
माझे मन बदलले तू मात्र भावनाशुन्य बनलीस...

सुकलेल्या मनावर तू प्रेमाचा पाऊस पाडलास 
मन माझे बहरले तू मात्र वृक्ष तोडीला लागलीस,

तू आपलं म्हणून माझ्या आयुष्यात शिरलीस 
मला न कळताच मला परकाही करून गेलीस 

सोमवार, १४ मार्च, २०११

फक्त तुझ्यासाठी......


आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....
नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....
अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.......!!