फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, १८ मे, २०१०

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल........
जाताना ती म्हणाली
घट्ट मीठी मारून जा
स्वप्नातल आयुष्य मला
आनंद म्हणुन देवून जा .....*********************************


गप्पच राहावस वाटत
तुझ्याजवळ बसल्यावर
वाटत तूच सगळ ओलाखावास
मी नुसत हसल्यावर..........*********************************


खुप दिवसानी भेट झाली
मला पाहून ती हसत होती
सहजतेने वावरताना
अलगद अश्रु पुसत होती.
काळ सरत असतो
आठवणी मात्र तश्याच राहतात,
सुख-स्वप्नांच्या हिन्दोल्यावर
मनामध्ये झुलत राहतात,
गाठीभेटी जुन्या कधीच्या
कायम हृदयी स्मरत राहतात,
माझ्या एकाकी मनाला
श्वास नवे देऊन जातात....

अशाच आठवणी स्मरताना
असेच श्वास घेतांना
असेच जीवन जगतांना
मग माला कविता स्फुरते
जीवनाने दिलेली प्रत्येक वेदना
मला तिथे स्मरते........

भाव सगळे हृदयामधले
सहज बाहेर येतांना,
शब्द कही ओठावरले
वाटा शोधू लागतात
खुप काही सांगताना
खुप काही राहून जाते
कुणालाच काही कळत नाही
माझे मन काय सांगते.....