काळ सरत असतो
आठवणी मात्र तश्याच राहतात,
सुख-स्वप्नांच्या हिन्दोल्यावर
मनामध्ये झुलत राहतात,
गाठीभेटी जुन्या कधीच्या
कायम हृदयी स्मरत राहतात,
माझ्या एकाकी मनाला
श्वास नवे देऊन जातात....
अशाच आठवणी स्मरताना
असेच श्वास घेतांना
असेच जीवन जगतांना
मग माला कविता स्फुरते
जीवनाने दिलेली प्रत्येक वेदना
मला तिथे स्मरते........
भाव सगळे हृदयामधले
सहज बाहेर येतांना,
शब्द कही ओठावरले
वाटा शोधू लागतात
खुप काही सांगताना
खुप काही राहून जाते
कुणालाच काही कळत नाही
माझे मन काय सांगते.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा