फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, १२ जानेवारी, २०११

आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतो
आणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतो
भावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतो
वेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतो

भरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूच
सुख देता देता दुःखच फक्त दिलेस तू
अश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतो
तरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतो

सुखाची तुझ्या भाषाच निराळी होती
पण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होती
मनाचा कोंडमारा सहन करीत जगासाठी हसत होतो
आणि एकांतात फक्त तुझ्यासाठी रडत होतो

सांग, तू विसरु शकशिल का?

ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?

तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?

तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं तुझी समजुत काढणं.
तू कसं विसरु शकतेस?

आपलं ते चांदण्यांखाली जागणं,
तुटलेला तारा पाहुन तुझं देवाकडे काहितरी मागणं;
जन्म-जन्मांच्या साथीची आण घेताना,
तुझा हात माझ्या हातात गुंफणं.
तू कसं विसरु शकतेस?

माझं ते तुझ्यासाठीचं तळमळणं,
तुझ्या स्वप्नांसाठी निद्रेची आराधना करणं;
तरीही नेहमी तुझ्या विचारात गढुन,
माझं रात्र रात्र जागणं.
तू कसं विसरु शकतेस?

तू कसं विसरु शकतेस;
माझं प्रेम,
माझ्या भावना,
माझं मन,
माझ्या वेदना.
सांग, तू विसरु शकशिल का? 

मंगळवार, ११ जानेवारी, २०११

खरच मी चुकलो....!

"खरच मी चुकलो....?

तिच्या बरोबर काही पाउले चालताना,
आणि आमच्या नात्याची सांगड़ घालताना.
खरच मी चुकलो ?

वेड्या मनाला आवर घालताना,
आणि का कोण जाणे तिला नकळत जपताना.
खरच मी चुकलो ?

ढ़ासळनारा तो पत्त्यांचा बंगला बांधताना,
आणि दरवेळी शब्दाशब्दाने नविन डाव मांडताना.
खरच मी चुकलो ?

आयुष्याच्या पाना पानावरची कहानी तिला मनापासून सांगताना,
आणि जे नाही तिच्याकडे ते हट्ट करून मागताना.
खरच मी चुकलो ?

ती फक्त ती आहे म्हणून तिला विसरून तिच्याकडे तिच्यासारख बघताना,
आणि मी फक्त मी आहे म्हणून स्वतःला विसरून मुलासारख वागताना.
खरच मी चुकलो ?

माझ हरवलेले अस्तित्व तिच्यामधे शोधताना,
आणि भावनाशुन्य अमितच मन वेदनानी आक्रोशाने भरताना.
खरच मी चुकलो ?

तिच्यापासून दूर जाण्यासाठी आज थोड वेगळ वागताना,
आणि हे सर्व लिहून मनापासून तिची माफ़ी मागताना.
मी सांगतो,

खरच मी चुकलो....!"
तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि त्या नंतर मला या जगण्याचा..
कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,

कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,

आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ....

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,
तेंव्हा आपण आपलेच राहिलेलो नसतो,
डोक्यात फक्त तिचाच विचार फिरत असतो,
अन डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा दिसत असतो,

आपल्या वागण्यात अचानक बदल घडतो,
गचाळपणा जावून टापटीप पणा येतो ,
दिवस-रात्र फक्त तिचाच विचार सुरु होतो,
अन आपल्याच जगात आपण रममाण होतो,

चोवीस तास मोबाईल कानालाच असतो,
मिनिटा-मिनिटाचा वृतांत प्राप्त होत असतो,
बाकी मित्र-मंडळीचा मग हळू-हळू विसर पडतो,
अन आई-वडिलांसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो,

दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने,
काळ असाच पुढे सरकत असतो,
दोघांच्याही नात्यात दररोज,
नव-नवीन रंग भरत असतो,

हळू-हळू सुरु होतो मग रुसव्या-फुगव्यांचा लपंडाव,
कधी याच्यावर तर कधी तिच्यावर येत असतो डाव,
कारण दोघेही घेत असतात एकमेकांच्या हृदयाचा ठाव,
काहीच नाही झालं की शेवटी बोलतात, आता एवढाही खाऊ नकोस भाव,

अचानक एक दिवस अशी येते वेळ,
त्यावेळी सुरु होतो नियतीचा खेळ,
मग दोघांच्यातही रहात नाही कसलाच ताळ-मेळ,
अन अर्ध्यावर्तीच मोडून जातो त्यांच्या प्रेमाचा खेळ... 

शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

इथेच आहे ती आजुनही 
वाचतही आसेल कदाचित ,
............हो नक्कीच 

तासन तास good morning 
ते good night होईपर्यंत 

ऑफिसच्या कटकटी बॉसची मुजोरी
बॉयफ्रेंडचे रूसणे नंतर मस्का मारणे 
रागीट होती,चंचल होती 
फोटोतही सुन्दर दिसत होती 
हट्टी होती ,लहरी होती 
बोलबोल बोलायची ती 

ऐकायचो मी सारे काही 
confession box सारखा 
p c च्या पडदयाआडून 
हेलकावत रहायचो सारखा 

आता झालोय delete कायमचा 
का ते मलाही विचारायचे नाही 

आणि हो लहर आली ........
तरी पुन्हा " add " करायची गरज नाही !!!

बुधवार, ५ जानेवारी, २०११

उफाळलेल्या समुद्रामधे,
संथ बुडणाऱ्या सूर्याकडे, एकटक पाहतांना.....
मनात असंख्य कल्लोळ.....

कल्लोळ!!!!
कधी विचारांचे, कधी आठवणींचे....
आणि कधी पापणीआड दडलेल्या,
ओलेत्या साठवणींचे.......

भिजलेल्या पापणीसवे , गंधाळलेले श्वास.....
आणि प्रत्येक श्वासानिशी, तुला भेटण्याची आस.....

तुझ्या-माझ्या भेटी आठवल्या कि,
उर्मी दाटते, ती पुन्हा तुला भेटण्याची.....
आणि नेमकी तेव्हाच.... नेमकी तेव्हाच शक्यता असते,
अशी जीवघेणी कातरवेळ गोठण्याची.....

कातरवेळ गोठली ना, कि जीव कासावीस होतो ग .....
मग तुझ्या आठवांनी..... आणि माझ्या आसवांनी.... जळत राहते रात्र तशीच....
आणि पहाट होता-होता...
पहाट होता-होता, श्वासांच्या ठिकऱ्या तेवढ्या, उरतात मात्र ओंजळीशी.....
उरतात मात्र ओंजळीशी....

मंगळवार, ४ जानेवारी, २०११

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी

तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "
तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"
मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...


पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..


आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय...

सोमवार, ३ जानेवारी, २०११

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी काही जगात पहिला नाही
ज्याच्या प्रियसीच लग्न झालाय
आता दु:ख करण्यात काय अर्थ
ती थोडीच परत येणार आहे
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी माझ्या मनाला समज घातली
पण, थोडा वेळ तर लागणारच
सार काही एका क्षणांत नाही संपत
या सारया लोकांना कोण सांगणार
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी जीवाच बर वाईट नाही करणार
मला पण भरपूर जगायचं
तिने मला प्रेमात नकार दिला म्हणून काय
मला अजून बरच काही बघायचं
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी कधी गप्प गप्प राहतो
याचा अर्थ मी तिचा विचार करतो असा
सारेच मला समजावण्याचा प्रयंत्न करतात
तुला हे वागण शोभत नाही असा म्हणतात
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

बाहेरच्या लोकांच एवढ मनावर घेत नव्हतो
पण, आता घरच्यानिहि सुरवात केली
काय झाल जरा सांगशील का आम्हला
का तिच्यासाठी तू हि अवस्था झाली
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

तिच्याएवढी ती सुंदर नसलीतरी 
कोणीतरी नक्कीच असेल माझासाठी 
अण, मी पण तिच्याच शोधात आहे
जिच्यासोबत देवाने बांधल्या सातजन्माच्या गाठी
(कारण आठव्या जन्मी फक्त ती हवी)

And that time no more compromise

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

कदाचित तुला माझी आठवण येईल

खिडकीत जेव्हा उभी तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ 
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही त्याच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
त्याच्या निथळत्या केसांमधून 
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !

रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल 
पावलांना तुझ्या स्पर्श होता, 
तो असल्याचा भास होईल 
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !

शनिवार, १ जानेवारी, २०११

"फुल होत ते माझ....

"फुल होत ते माझ....

प्रेमात पडल्याने हिरमुसलेल,
का एवढा जपतो त्याला म्हणून माझ्यावरतीच रुसलेल.

फुल होत ते माझ....

माझ्या मिठीत माझ्या वेदनाना बिलगून ओलचिम्ब भिजलेल,
मला उब देण्यासाठी मात्र स्वतः निखाऱ्यासारख जलुन विझलेल.

फुल होत ते माझ....

माझ्या शब्द भावनाना कविता समजुन भूललेल,
न कळत माझ आयुष्यच दळवलुन माझ्या ह्रुदयात फुललेल.

फुल होत ते माझ....

ढासललेल्या अमितला पुन्हा पुन्हा उभ करणार,
थरथरणाऱ्या त्या माझ्या हाताला अलगद घट्ट धरणार.

फुल होत ते माझ....

मला त्रास नको म्हणून पाकळीमधेच रडणार,
शेवटचा स्पर्श म्हणून दोन आसवाना खांद्यावर ठेवून मला कायमच सोडणार.

फुल होत ते माझ....

तिला न विचारताच कुणी तरी तोडलेल.
स्वप्न होत ते तीच माझ,