फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ५ जानेवारी, २०११

उफाळलेल्या समुद्रामधे,
संथ बुडणाऱ्या सूर्याकडे, एकटक पाहतांना.....
मनात असंख्य कल्लोळ.....

कल्लोळ!!!!
कधी विचारांचे, कधी आठवणींचे....
आणि कधी पापणीआड दडलेल्या,
ओलेत्या साठवणींचे.......

भिजलेल्या पापणीसवे , गंधाळलेले श्वास.....
आणि प्रत्येक श्वासानिशी, तुला भेटण्याची आस.....

तुझ्या-माझ्या भेटी आठवल्या कि,
उर्मी दाटते, ती पुन्हा तुला भेटण्याची.....
आणि नेमकी तेव्हाच.... नेमकी तेव्हाच शक्यता असते,
अशी जीवघेणी कातरवेळ गोठण्याची.....

कातरवेळ गोठली ना, कि जीव कासावीस होतो ग .....
मग तुझ्या आठवांनी..... आणि माझ्या आसवांनी.... जळत राहते रात्र तशीच....
आणि पहाट होता-होता...
पहाट होता-होता, श्वासांच्या ठिकऱ्या तेवढ्या, उरतात मात्र ओंजळीशी.....
उरतात मात्र ओंजळीशी....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा