फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, २ जून, २०११

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर


आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही...

सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..


डोळ्यातील पाणी सुकून जाते,
ओल्या जखमा मात्र काही केल्या सुकतच नाही ..


दुखं तेवढी सगळी सोबत असतात,
सुख मात्र थांबतच नाही...

अश्यावेळी समजवायला आपल्याला सगळे जण,
समजून मात्र कोणीच घेत नाही ...

वाटते मग देव तरी समजून घेईल आपल्याला,
कारण भावना आपल्या काही वाईट नाही ..

मग विटून जाते मन आपले देवाकडे प्रार्थना करून करून,
पण मन आपले त्यालाही कधी कध्धीच कळत नाही...

विसरून जावे म्हणतो आता सगळे ,
पण आठवण आल्याशिवाय काही रहात  नाही ...

कारण माझीच माणसे आहेत ती सगळी ,
मी त्यांचा आणि ती माणसे माझी ,
या शिवाय माझ्या मनाला दुसरं काहीच कळत  नाही ...

मोजकेच ठरलेले असते ना आयुष्य हे आपले 
आणि त्यातही एकमेकांचे मन दुखावून काहीच उपयोग नाही ...

परिस्थिती मुळेच माणूस घडत किवा बिघडत असतो ,
त्यामुळेच निर्माण होत असते त्याची चांगली किंवा वाईट ओळख,
म्हणूनच आता असे वाटते कि जे काही घडत आहे त्यात कोणाचा काही दोष नाही ...

आपले दुखं आपणच सांभाळावे आता,
आणि दुसरयाचे दुखं हि घ्यावे वाटून आपण,
मिळाले सुख तर त्यातूनच मिळेल,
कारण दूसरा कोणता आता मार्गच नाही ...

संपून जाईल लवकरच सगळे काही,
ना सुख उरेल ना दुखं,
संपण्यासाठीच हे सर्व,
आणि उरण्यासाठी काहीच नाही ....
काहीच नाही ......