फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, १ जुलै, २०११

तुला माझी आठवण येते ?


अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना
......एकदा तरी माझी आठवण काढ.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा