फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १६ मे, २०११

विसरेन विसरेन म्हणत तेच तेच क्षण आठवतात .....

विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात

का ती आठवते? अन मन होते उदास
नसण्याने तिच्या होतो वेडेपणाचा आभास
वेड्यात काढतात मित्र अन नाव मला ठेवतात
पण काय करू मी
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................

का ती आठवते? अन हृदय हि कोमेजते
न दिसणाऱ्या तिची हृदयात छवी उमटते
अशा छवीला पाहून मरतो मी एकांतात
पण काय करू मी
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................

का ती आठवते? अन हास्याची रांगोळी होते
रंगात आलेल्या मैफिलीला बेरांगाची साथ मिळते
कधी न पडलेली अभद्र स्वप्न हि आत्ताच दिसू लागतात
पण काय करू मी
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................

का ती आठवते? अन होते निराशा
आठवणीत तिच्या फक्त अश्रुंचाच ओलावा
अश्रू हि सुकतात अन डोळे माझे थकतात
पण काय करू मी
विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात .................

विसरेन विसरेन म्हणत
तेच तेच क्षण आठवतात ................

आता खरच सवय झालीये.

"आता खरच सवय झालीये....!
एकट्यानेच चालायची,
आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची.

सवय झालीये....
मनातल्या मनात रडायची,
आणि ठेच लागुन पडायची.

सवय झालीये....
आपल्या मानसापासून दूर जायची,
आणि डोळे भरून त्यांची वाट पहायची.

सवय झालीये....
जिंकत नसलो तरी हरायची,
आणि आयुष्य एक एक दिवसाने भरायची.

सवय झालीये....
स्वतःवरती रुसन्याची,
आणि नाव पुन्हा पुन्हा लिहून पूसन्याची.

सवय झालीये....
पोरक करणाऱ्या मायेची,
आणि उन्हात मला तडफडत सोडून जाणाऱ्या छायेची.

सवय झालीये....
त्याच त्याच शब्दाना फसन्याची,
आणि स्वतः स्वतःवर हसण्याची.

सवय झालीये....
जिवंतपनी मरायची,
आणि शेवट नसलेली सुरुवात करायची.

सवय झालीये....
स्वतःच्या अश्रुमधे सांडायची,
आणि तेच भिजलेले शब्द मांडायची.

आई शपथ,
आता खरच सवय झालीये...."

शनिवार, १४ मे, २०११

आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..


पहिल्यांदा CANTEEN मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा, अप्सरा जणू भासत होती..
मी 'आ' वासून बघत राहिलो... तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..

पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, 

अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,
DARING करून 'मारला' PROPOSE... ती लाजून 'इश्श' म्हणाली.. ( ती तिकडे 'इश्श'.. आम्ही इकडे 'खुश्श'.. ;-D )
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..

पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..


सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा सोडला नाही..
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती...
सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..

पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण तसलं काही करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला?
खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?
खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय..
एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन

या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते
आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते 

गुरुवार, १२ मे, २०११

कधी वाटलंच नव्हतं..


जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

...मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आठवणी आयुष्य बनून जातात...




आजही भावना आहेत जपलेल्या 
पण आता काही लिहू वाटत नाही
तुझ्या विरहात सुगंधी पानांना
आसवांच्या शाईने भिजवू वाटत नाही

तुझ्याच कणा-कणांनी रचलेल 
सगळ अस्तित्व माझं पण....
पण आता त्यात स्वताला शोधण्याचा 
वेड्या मनाचा अटहास नाही
भेटीची अधीर आता ती ओढ नाही
झुरणारा विरक्त तो श्वासही नाही

सरली सर्व युगे......
जी भरली होती तुझ्या स्पर्शाने

तरीही तू अजून तिथेच राहतेस 
खोल कुठेतरी मनाच्या तळाशी 
मंद मंद श्वासामध्ये बहरत जातेस
पावसाच्या सरीसवे चिंब भिजवतेस 

कोणी म्हणत वेडेपणा याला
कोणी म्हणे मनाचा खेळ आहे
पण केल्याशिवाय कस कळेल कोणाला
प्रेम स्वताच्या अस्तित्वच्या पलीकडे आहे

कारण,
काही क्षण जगलेले स्पर्श हळवे शेवटपर्यंत सोबत राहतात
आणि कधी-कधी काही आठवणी आयुष्य बनून जातात.....

शुक्रवार, ६ मे, २०११

माझे मरण



श्वास होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,


नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हानव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तरआले सगळे टाहो फोडायला,


आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,


जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,


जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,


आज काय किम्मत 'त्यारडण्याला?,
आज काय किम्मत 'त्याछाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'तीघरपूजा करण्याला


गुरुवार, ५ मे, २०११

माझी तू त्याची होताना


मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्षी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

माझ्या डोळ्यातील आसु अन
तुझ्या ओठांवरील हसु
यांचे साधर्म्य जाणताना
सांग ना सखे तुच आता
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

बुधवार, ४ मे, २०११

खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???


खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का??? 
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 



होते ते प्रेम कधी बालपणात 
तिच्या हसण्यात आणि लाजुन बघण्यात 
समज नसते त्या प्रेमाची 
त्या आतील नात्यांची 
लहानपनी तरी कधी जाणवते का??????...... 
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का??? 
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
प्रेमात लोक आंधळी होतात 
पण जे प्रेम करतात तेच समजतात 
पाहिले प्रेम हे काय आहे 
दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे 
प्रेम हे वया प्रमाणे बदलते का?????? 
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का??? 
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
ज्यांना भेटते ते असतात सुखी 
पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी 
हा तर नशिबाचा खेळ आहे 
आणि नशिबाने घातलेला मेळ आहे 
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का??? 
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........ 
 
 
माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे 
पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे.. 
खरचं पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???????? पण ते प्रेम आयुष्य भर राहते का?????