फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

तुझी आठवण आली की

तुझी आठवण आली की मला माझाच राग येतो,
संपले ना सर्व तुझ्याकडून, मग असा का त्रास देतेस...

नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी,
आठवून सर्व की करू, मग डोळ्यात येते पाणी....

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत, तुला इतरांपासून लपवू कसे?
भरभरून वाहणाऱ्या अश्रूंना थोपवून, खोटे हसू आणायचे तरी कसे?

ते अश्रू लपवण्याच्या प्रयत्नांत, मग मी तुलाच दोष देत राहतो,
आणि त्या खोट्या प्रयत्नांत, तुला आणखीनच आठवत राहतो......

सांगितले कितीदा तिला

सांगितले कितीदा तिला
प्रेमात फक्त घ्यायचे नसते,
द्यायचे ही असते

तेव्हा ती घेऊन गेली,
हृदय माझं,
अन देऊन गेली,
रक्ताळलेलं दुःख

आधीच शरीर झालं होतं,
एक दगड मुर्दाड
आणि आता त्याला पडलं आहे,
हृदयाएवढं भगदाड

पाणावलेले डोळे

पाणावलेले डोळे 
ओलावलेल्या पापण्या 
कशा व्यक्त करू मी...
...दाटलेल्या भावना? 

भावनांचा पूर 
दाटून आलेला उर 
मन...सैरभैर...
जसं आत्म्याशीच वैर! 

वाहत होतीस तू 
वाहत आहे मी !!
तीरावर थांबलेली तू 
बुडतो आहे मी!!!

तू गेल्यापासून...

तू गेल्यापासून...
मी नसतो कुणाचाच
घरातही माझा वावर परका
तू गेल्यापासून...

तू गेल्यापासून...
मी बसतो विखरून
कधीहून उदास सांजफुटका
तू गेल्यापासून...

तू गेल्यापासून...
ढासळतात आठवणींच्या इमारती
उत्खननातही सापडती तुझेच अवशेष
तू गेल्यापासून...

तू गेल्यापासून...
मी करतो अलविदा
कुणीही दिसता येता जाता
तू गेल्यापासून...

कळले ना काही कुणास तेव्हां

कळले ना काही कुणास तेव्हां
कुणी कुणाला घाव दिले
कळले ना काही दैवाला या
कुणी असे बद नाव दिले


भोळा भाबडा चेहरा होता
खंजीर लपवून उभा होता
कळले ना मजला रक्त सांडता
थेंबांचे त्या ही भाव केले


वेदना माझी अव्यक्त राहीली
शब्द त्यांना देऊ गेलो
घाव दिले त्यालाच का रे 
दुनियेने या पुन्हा वाव दिले


अलगद माझा जीव गेला
तुमचे काय गेले सांगा..
पुतळेही माझे जळून गेले
हसणा-यांचे मज गाव दिले