फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

माझ्या शितल साठी माझी शेवटची कविता......

सारं आठवतय.......
आपल्या नेहमीच्या बाकावर बसणं
तिथे खांद्यवर डोकं ठेवून एकमेकांत रमून जाणं
"देशील ना मला साथ म्हणून" 
माझ नेहमीचं विचारणं...
तुझे ही मला हसत हसत उत्तर देण..
नाही जाणार सोन्या तुला कधी सोडून...
सारं आठवतय..........

असच सगळं अलबेल चालू असताना..
एकेदिवशी तुझा मला फोन येन,
आणि मला बोलणं, माझा विषय दे सोडून,
नंतर मी तुला शेवटच भेटायला बोलावणं
तुझ ते वागण पाहून सगळं मला समजणं
तरीही मी तुला विचारणं
त्यावर जा मला विसरून असं म्हणून
तुझं ताडकन निघून जाणं
सारं आठवतय.........

तू जात असताना 
तुझा हात रिक्षात मी घट्ट पकडून ठेवण 
माझं तुला डोळे भरून पाहणं
त्या मध्येही डोळ्यात पाणी येणं
तुझं साधं मागे वळूनही न पाहणं
सारं आठवतय
सारं आठवतय................ 

त्याच आठवणी घेऊन मला आता संपूर्ण आयुष्य काढायचंय,
तुझ्या आठवणीत आता मला माझ्या सोबत ठेऊन जगायचं.......

तू तर जीव घेऊन निघून गेलीस...
तरीही आज जीव जळतोय.....
तू परत येण्याची आस आजूनही मनात आहे,
म्हणूनच मी आता जगतोय....

८ टिप्पण्या:

  1. शब्दच नाही उरले .खरच डोळे भरून आले

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्यासोबत पण तुझ्यासारखच झाल, तिच नाव पण शितलच होत, फार प्रेम करायची माझ्यावर आणि आसच एकट सोडून ति निघून गेली

    उत्तर द्याहटवा