फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०१०

ती म्हणायची.........



डोळ्यांत तुझ्या पाहिलं की......
आरश्यात पहावसच वाटत नाही.......
हृदयात तुझ्या राहते मी.......
आत्ता घरी रहावसच वाटत नाही.......!!

गालावरची खळी पाहिली की......
हसू थांबावच वाटत नाही.......
खुप आनंदी असलास की.......
आनंद ओसरावाच वाटत नाही.......!!

जवळ असलास माझ्या की.......
तुझा सहवास नसावाच वाटत नाही......
खुप करतोस प्रेम माझ्यावर......
माझं प्रेम आटावसच वाटत नाही.......!!

तुझी आठवण येणार नाही.......
असा दिवस यावासाच वाटत नाही......
चांदण्या रात्रीचं रम्य स्वप्न.......
स्वप्न तूटावसच वाटत नाही......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा