फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

काल Friendship Day होता

काल Friendship Day होता,
पण कोणी मित्त्रच जवळ नव्हता,
म्हणून मग विचार केला, आपण पड्लेलोच आहोत एकटे,
तर मग कशाला हवे आपल्यासोबत कोणी दुसरे,

दुपार पर्यंत राहिलो कसातरी, 
थोड्यावेळासाठी वाटले, 
आपली जवळची व्यक्तीच नाही आपल्यासोबत,
तर लांबचे मित्त्र काय येणार?

मनात आशा होत की तुझा फोन येईल, पण तो काही आलाच नाही,
शेवटी मग तुझ्या आठवणी घेऊन ५ वाजता पडलो घराच्या बाहेर,

जाऊन जाऊन जाणार तरी कुठे म्हणून मग तिथेच गेलो,
जिथे आपण दोघे नेहमी जायचो, त्याच garden मध्ये...
ज्या जागेवर आपण दोघे बसायचो तिथे मी काल एकटाच बसलेलो,
3 couples आले होते तिथे, त्यांना पाहून मला जरा वाईट वाटले,
कारण मी काल एकटाच होतो ना.....!

खूप आठवण येत होती काल तुझी, 
त्यामुळे अश्रू काही थांबायला मागत नव्हते ...
तू अशी अचानक सोडून जाशील ह्या अमित ला असं कधी वाटलं नव्हत,
कदाचित माझीच काहीतरी चूक झाली असावी ह्या मागे असाच मला आजूनही वाटतय,

तू पुन्हा माझ्याचकडे येशील ह्याची खात्री आहे मला, 
पण तो पर्यंत बोलना सोडून दिलंयस ह्याच थोड दुःख होतंय मला....

तुझी आठवण खूप सतावते आहे ग सोन्या,
please एखादा Call कर ना मला...

बोलतात ना १०० चांगल्या गोष्टीतून एखादी चुकीची गोष्ट केली की ती दिसून येत नाही,
तसाच आठवड्यातून एखादा call केलास तरी कुणाला काहीच कळणार नाही,

तुझ्यासाठी नाही तर ह्या अमित साठी तरी......Please........

प्रेमाला साक्ष कशाला हवी गं

प्रेमाला साक्ष कशाला हवी गं
चंद्राचे लक्ष कशाला हवे गं
का झाकतेस सखे तु मुखाला 
आता हवी ही ऒढनी कशाला

सखे् तुझा दे हातात हात
होते तर होउ दे प्रेम दीप तप्त
मनात आहे ते बोलुन दे ना
नको मनात आणुस तुझेमाझे आप्त


का सोडायाचा हा क्षण व्यर्थ
माझ्या मनात ते तुझ्या मनात
बघ समुद्र कसा खवळला आहे आता
सुर्य ही बघतो बघ जाता जाता


निरोप माझा असा नको घेउस
बाहुत माझ्या लाजु नकोस
डोळ्यात माझ्या स्वता:ला शोधु नकोस
ह्रुदयातुन माझ्या तु जाउ नकोस.

तुझ्या आठवाणीं

फारच वेडी आहे बघ ती...
अगदी तुझ्यासारखीचं...

कधी चार पाऊल सोबत चालते...
अन कधी उगाच पुढे पळत राहते...
तर कधी येते दबकत मागुन माझ्या...
रोज मला ही अशीच छळते....

तिचा अन माझा हा लपंडाव
आता रोजचाच झाला आहे...
तुझ्या आठवाणींनी माझ्या घरात
अगदी उच्छाद मांडला आहे...

पण म्हणतात ना...
"तुझं नि माझं जमेना...
अन तुझ्याविना तर करमेना..."
अगदी तसचं झालं आहे बघ...
माझं आणि तुझ्या आठवाणींचं...

असली की जीव अगदी नकोसा करून टाकते...
आणि नसली....
आणि नसली की मलाच जीव नकोसा होतो..

अजूनही....

अजूनही कधी कधी तू येशील असं वाटतं,
तुझ्या कल्पनेनेसुद्धा आभाळ डोळ्यात दाटतं...
नंतर सुरु होतो तो अविरत बरसणारा उनाड पाऊस...
तो पाऊस, त्या जलधारा...सारं काही तसंच आहे अजूनही...
तोच रस्ता,त्याच वाटा...खुणावतात अजूनही...
पण का कोण जाणे मला हे सारे माझेच शत्रू वाटतात, 
स्वतःपासूनही धावलो तरी हे बरोबर वाटेत गाठतात...
मला तुला विसरायचंय, हे यांना मुळी पटतच नाही,
म्हणतात, लाटेचं अन सागराचं नातं कधी तोडूनही तुटत नाही...
खरंच इतकं गहिरं आहे का ग तुझं-माझं नातं?
अजूनही का मन माझं तुझंच गाणं गातं?
तुला जायचंच आहे ना तर खुशाल निघून जा,
जाता जाता माझ्या मनातील आठवणीही घेऊन जा...
ते करशीलही; पण तुझं काय, हा पाऊस अन या वाटा तुला नाही छळणार?
शांत समुद्रातलं आठवणींचं थैमान त्यांना नाही कळणार?
म्हणूनच अजूनही तू येशील असा विश्वास आहे,
अजूनही या कृष्णाला आपली राधा येण्याची आस आहे...
ही वाट तुला बोलावतेय एकदा तरी मागे बघ,
खरोखरीच आकाशात भरून आलेत काळे ढग...
पाऊसही आता बघ हळूहळू निवळतोय,
तुझ्यासाठी माझ्यासारखा तोही अधीर होतोय...
हे सगळं आपलं आहे, एकदाच परत ये,
शब्द नको आता फक्त डोळ्यांनाच बोलू दे...
पावसासारखं एकदा त्यांनाही बरसायचंय,
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात स्वतःला विसरायचंय....
नकोस आता इतकं छळू सगळा रुसवा सोडून दे,
कितीदा ग बोलवू, परत ये, परत ये...