फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २७ जुलै, २०११

मी होतो आयुष्यात तरी वाट तुला नव्या प्रेमाची होती ..
मी तुटलो संपलो प्रेमात तरी अपेक्षा तुझी वेगळीच होती ...
जगापासून लपवत आपले नाते हे फुल माझे आता फुलपाखरू नाव शोधू लागल ...
माझ्याच गैरसमजुतीचा परिणाम आहे जे कि मी प्रेम समजलो आणि माझे फुल दुसर्याच कधीच होऊन गेल ...

शुक्रवार, २२ जुलै, २०११

"माझे श्वास मिटण्याआधी
एकदा येऊन भेटून जा
गळून पडलेल शरीर माझ
एकदा अंगाशी लपेटून जा....
माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
एकदा येऊन समेटून जा
श्वास माझे मिटण्याआधी
फ़क्त एकदा येऊन भेटून जा"

मंगळवार, १९ जुलै, २०११

म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही ! . .


मुखवट्यांच्या पसा-यात....मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

आतून - आतून येतात कढ
रडावसं वाटत नाही...
विनोदावर कुठल्याही
साधं हसू फ़ुटत नाही....

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

येते सर जाते सर
चिंब मन भिजत नाही...
येतो वारा घालतो घाला
रक्त काही सळसळत नाही...

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

शुक्रवार, १ जुलै, २०११


खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार
...
विरह हा नाही सहन होत
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार
कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

काळजवारची जखम अजून ओलीच आहे
कारण तू तिला सुकायच वाव दिला नाहीस
एक दुख संपण्याआधी प्रतेक वेळेला
दुसरा घाव दिला आहेस...
...पण असुदे,
तू नसण्याच्या दुखापेक्षा
तू दिलेल्या जखमा तर माझ्या आहेत
तू माझी नसण्यापेक्षा तू माझीच असल्याच्या
आठवणी तर अस्तित्वात आहेत

तुला माझी आठवण येते ?


अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना
......एकदा तरी माझी आठवण काढ.......