फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, १९ जुलै, २०११

म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही ! . .


मुखवट्यांच्या पसा-यात....मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

आतून - आतून येतात कढ
रडावसं वाटत नाही...
विनोदावर कुठल्याही
साधं हसू फ़ुटत नाही....

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

येते सर जाते सर
चिंब मन भिजत नाही...
येतो वारा घालतो घाला
रक्त काही सळसळत नाही...

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा